नवी दिल्ली: मित्रांनो जर आपण नोकरीला कंटाळला असाल आणि व्यवसाय सुरु करू इच्छित असाल किंवा व्यवसाय करण्याचे स्वप्न आहे मात्र व्यवसाय कोणता करावा हे सुचत नसेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. मित्रांनो खरं पाहता, आजच्या या काळात असे अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत जे अगदी कमी गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात.
असे अनेक व्यवसाय आहेत ज्यातून चांगला बक्कळ नफा आजच्या काळात कमवले जाऊ शकतो. जर तुम्ही असाच कमी गुंतवणूकीत चांगला बक्कळ नफा कामविणारा बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेस प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये मोजावे लागतील आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही ते एका खोलीतही सुरू करू शकता.
मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे एलईडी बल्ब बनवण्याचा. हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी पैशात सुरू करू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही अवजड आणि महागडे मशीन आणण्याची गरज नाही. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला बाजारातून सर्व काही तयार मिळेल. तुम्हाला फक्त सामान घरी आणायचे आहे आणि ते असेंबल करायचे आहे आणि बाजारात विकायचे आहे.
हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आहे. तुम्हाला फक्त कच्चा माल आणि काही आवश्यक सामान एकत्र आणायची आहेत. अशा प्रकारे तुमचा व्यवसाय अगदी स्वस्तात आणि सहज सुरू होईल. सध्या दिव्यांच्या नावाखाली सर्वत्र फक्त एलईडी बल्ब आणि ट्यूबलाइटच दिसत आहेत. हे कमी वीज वापरासह अधिक प्रकाश देते. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. म्हणूनच आता प्रत्येकजण पारंपारिक बल्ब वापरत आहे आणि दिव्यांऐवजी एलईडीला महत्त्व दिले जात आहे. यामुळे निश्चितच या व्यवसायाला प्रचंड डिमांड आहे.
खरं काय! ड्रीप इरिगेशनसाठी 'इतकं' मिळतं अनुदान; वाचा याविषयी
तुम्ही हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर यासाठी तुम्ही प्रशिक्षण देखील घेऊ शकता. देशात अनेक कंपन्या एलईडी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतात या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. तसेच, काही समस्या आल्यास या कंपन्या तुम्हाला सहकार्य देखील करतील.
नफा किती होईल?
जाणकार लोकांच्या मते, तुम्ही 8 तास काम करून 250 बल्ब सहज बनवू शकता. एक बल्ब बनवण्यासाठी 10 ते 15 रुपये खर्च येतो. आता हा बल्ब बाजारात 40 ते 70 रुपयांना सहज विकता येतो. अशा प्रकारे पाहिल्यास, तुम्हाला तिप्पट नफा होईल. निश्चितच हा व्यवसाय कमी कालावधीत चांगला बक्कळ पैसा मिळवून देणारा व्यवसाय आहे.
Published on: 14 May 2022, 11:05 IST