Others News

Business Idea 2022: जर तुम्हाला इतरांच्या नोकऱ्या करून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला तुमचा नवीन स्टार्टअप (Business) सुरू करायचा असेल तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करणार आहोत. मित्रांनो आम्ही तुम्हाला कर्ज वगैरे देणार नाही, परंतु मित्रांनो आम्ही तुम्हाला नवीन बिजनेस आयडिया (Business Idea) देणार आहोत, जेणेकरून तुम्ही कमी मेहनतीत जास्त कमाई करू शकता (Good Income Business)

Updated on 20 July, 2022 10:10 PM IST

या कामात तुम्हाला सरकार देखील मदत करेल.

आता मुख्य मुद्द्यावर येत आहोत, कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे जेणेकरून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतील.  तर मित्रांनो तुम्ही साबण कारखाना (Soap Making Business) उघडून तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता.

साबण कारखान्यातुन तुम्हाला दर महिन्याला भरघोस उत्पन्न मिळू शकते. आता दररोज साबणाचा वापर केला जातो, अशा स्थितीत तुमच्या उत्पन्नासाठी ही सर्वोत्तम कल्पना सिद्ध होऊ शकते आणि केंद्रातील मोदी सरकार स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्याचा सल्ला देत असल्याने (Atmanirbhar Yojana) तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज (Pradhanmantri Mudra Loan) व्यवसायासाठी सहज मिळवू शकता.

साबण व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी-

साबण व्यवसाय सुरू करण्यासाठी, प्रथम तुम्हाला त्याचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून नवीन स्टार्टअप्ससाठी कर्ज सहज उपलब्ध आहे.

या योजनेअंतर्गत व्यवसायात गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी 80 टक्के रक्कम लोकांना कर्जाच्या स्वरूपात दिली जाते. मित्रांनो तुम्ही दर महिन्याला 3000 किलो साबण तयार करत असाल तर यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येईल.

अशाप्रकारे हा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला वर्षाला सुमारे 47 ते 50 लाखांचा खर्च येईल. आता हा व्यवसाय सुरू करायचा की नाही हे अवलंबून असेल ते यातून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नावर. एका अंदाजानुसार, साबण व्यवसायातून तुमचे वार्षिक उत्पन्न सुमारे 56 ते 57 लाख रुपये असेल. म्हणजे तुम्हाला सहा ते दहा लाख रुपये यातून निव्वळ नफा राहू शकतो.

English Summary: business idea start soap making business
Published on: 20 July 2022, 10:10 IST