Others News

Business Idea : अलीकडे देशातील तरुण वर्ग व्यवसायाकडे (Business News) अधिक वळत असल्याचे चित्र आहे. आता स्वतःचा व्यवसाय (Small Business Idea) सुरू करण्याची इच्छा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. आता अशा लोकांची संख्या सतत वाढत आहे, ज्यांना नोकरी करण्याऐवजी आपला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे. खरं पाहता व्यवसायात (Business Story) नोकरीपेक्षा जास्त पैसे कमावण्याच्या (Earn Money) संधी असल्याने आता नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक पसंती दर्शवली जात आहे.

Updated on 04 September, 2022 8:17 AM IST

Business Idea : अलीकडे देशातील तरुण वर्ग व्यवसायाकडे (Business News) अधिक वळत असल्याचे चित्र आहे. आता स्वतःचा व्यवसाय (Small Business Idea) सुरू करण्याची इच्छा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे.

आता अशा लोकांची संख्या सतत वाढत आहे, ज्यांना नोकरी करण्याऐवजी आपला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे. खरं पाहता व्यवसायात (Business Story) नोकरीपेक्षा जास्त पैसे कमावण्याच्या (Earn Money) संधी असल्याने आता नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक पसंती दर्शवली जात आहे.

मात्र असे असले तरी अनेकदा लोकांमध्ये कोणता व्यवसाय करायचा याबाबत कॉन्फ्यूजन असते. अनेकांना व्यवसायाच्या कल्पना सुचत नाहीत. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी एका बिझनेस आयडिया ची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण ज्या बिझनेस आयडियाविषयी चर्चा करणार आहोत त्या बिजनेसची नेहमीच डिमांड पाहायला मिळते. मित्रांनो आज आपण सोप मॅन्युफॅक्चरिंग अर्थात साबण बनवण्याच्या व्यवसायाविषयी (Soap Manufacturing Business) जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया सोप मनुफॅक्चरिंग बिझनेस प्लॅन (Soap Making Business Plan) विषयी.

मित्रांनो जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न कमवायचे असेल तर तुम्ही साबण निर्मिती व्यवसाय सुरु करू शकता. जाणकार लोकांच्या मते हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत देखील सुरू केला जाऊ शकतो. मित्रांनो साबण हे असे उत्पादन आहे, जे प्रत्येक घरात वापरले जाते आणि साहजिकचं याची मागणी नेहमीच राहते.

अशा परिस्थितीत सोपं मनुफॅक्चरिंग बिझनेस सुरु करून कपडे धुण्याचा साबण, आंघोळीचा साबण आणि डिश साबण बनवता येतो आणि सहज विकता येतो. मित्रांनो साबण बनवण्याच्या अनेक कंपन्या अस्तित्वात आहेत. मात्र अजूनही अनेक लोकांना स्थानिक पातळीवर बनवलेला साबण आवडतो. हेच कारण आहे की तुम्हाला जवळपास सर्वत्र साबणाचे स्थानिक ब्रँड दिसतील.

असा सुरू करा सोप मॅन्युफॅक्चरिंग बिजनेस 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, साबण बनवण्यासाठी अनेक प्रकारची यंत्रे लावावी लागतात. यासाठी तुम्हाला एक्सट्रूडर मशीन, डाय, मिक्सर मशीन, कटिंग मशीन आणि कच्चा माल लागेल. यासोबतच तुम्हाला काही कामगारही घ्यावे लागतील.

म्हणून, साबण बनवण्याचे युनिट स्थापित करण्यासाठी, तुम्हाला किमान 1000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. एका अंदाजानुसार, मशिन आणि कच्च्या मालावर 7 लाख रुपये खर्च करून एक चांगले साबण बनवण्याचे युनिट सुरू केले जाऊ शकते. निश्चितच सात लाख रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू केला तर या व्यवसायातून चांगली कमाई देखील होणारं आहे.

English Summary: business idea soap manufacturing business marathi
Published on: 04 September 2022, 08:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)