Others News

Business Idea : आपल्या भारतात गेल्या काही वर्षांपासून नवयुवक तरुण नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक पसंती दर्शवित असल्याचे चित्र आहे. जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी.

Updated on 02 September, 2022 7:56 AM IST

Business Idea : आपल्या भारतात गेल्या काही वर्षांपासून नवयुवक तरुण नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक पसंती दर्शवित असल्याचे चित्र आहे. जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अतिशय मस्त बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही दिवसात लाखोंची कमाई करू शकणार आहात. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत तो व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

मित्रांनो आम्ही आपणांस डिस्पोजेबल पेपर कप बिझनेस आयडिया बद्दल सांगणार आहोत. देशभरातील लोक या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. प्लास्टिक बंदीनंतर डिस्पोजेबल पेपर कप आणि ग्लासेस वापरण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याची मागणी खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. या व्यवसायात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिस्पोजेबल पेपर ग्लास बनवावे लागतील आणि ते बाजारात विकावे लागतील. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल सविस्तर.

मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला छोटी-मोठी मशीन्सची आवश्यकता भासणार आहे. मित्रांनो छोट्या यंत्राच्या साहाय्याने लहान कागदाचे डिस्पोजेबल ग्लास बनवले जातात. याशिवाय आपण मोठ्या मशिनच्या मदतीने वेगवेगळ्या आकाराचे कागदाचे डिस्पोजेबल ग्लास बनवू शकता. मित्रानो जर आपण लहान कागदापासून डिस्पोजेबल ग्लास बनवणारे मशीन विकत घेतले तर तुम्हाला सुमारे 1 ते 2 लाख रुपये खर्चाची आवश्यकता असणार आहे.

मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला उत्पादन बनवण्यास सुरूवात करावी लागणार आहे. याशिवाय पेपर कप बनवण्यासाठी तुम्हाला कच्च्या मालाचीही आवश्यकता असेल. कच्चामाल तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होणार आहे. 90 रुपये किलो दराने कागदी रीळ मिळतो जो की या व्यवसायासाठी कच्चा माल म्हणून उपयोगात आणला जातो. याशिवाय, तुम्हाला 80 रुपये प्रति किलो दराने ग्लासच्या तळाची रील मिळेल.

मित्रांनो जर तुमच्याकडे पैसे नसतील. तरी देखील चिंता करण्याचे काही कारण नाही कारण अशा परिस्थितीत तुम्ही मायबाप शासनाकडून कर्ज सुद्धा घेऊ शकता. पेपर ग्लासचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मदतीने कर्ज देखील घेऊ शकता. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही दरमहा 75 हजार रुपये किंवा त्याहून अधिक कमवू शकता.

English Summary: business idea papercup making business
Published on: 02 September 2022, 07:56 IST