Others News

'वन नेशन वन रेशन कार्ड' या केंद्र सरकारच्या योजनेचा देशातील जनतेला फायदा होत आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.

Updated on 12 May, 2022 4:33 PM IST

New Delhi : रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख दिली होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुम्ही रेशन कार्ड आधारसोबत (Aadhaar card -Ration card Link) लिंक केलं नसेल, तर ते लवकरात लवकर करुन घ्या. यांसंदर्भात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

'वन नेशन वन रेशन कार्ड' या केंद्र सरकारच्या योजनेचा देशातील जनतेला फायदा होत आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. रेशन कार्ड (Ration Card) आधारसोबत लिंक करणे अनिवार्य आहे. तुमचे रेशन कार्ड आधारसोबत लिंक असेल तर तुम्ही देशातील कुठल्याही रास्त भाव दुकानातून अन्नधान्य घेऊ शकता.


सध्या ऑनलाईन पद्धतीमुळे हे काम अधिकच सोपं झालं आहे. घरबसल्या रेशन कार्ड (Ration Card) आधारसोबत (Aadhaar card) लिंक कसं करायचे ते आता पाहुयात.

uidai.gov.in या आधारच्या अधिकृत वेबसाईट वर जा. त्यानंतर
'Start Now' या पर्यायावर क्लिक करा.
नंतर तिथे एक फॉर्म येईल त्या जागी राज्याच्या उल्लेखासह संपूर्ण पत्ता भरा. नंतर

'Ration Card Bedefit' या पर्यायवर क्लिक करा.
आता आधार नंबर, रॅशन कार्ड नंबर, इमेल आयडी आणि विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
जेव्हा तुम्ही ओटीपी सबमिट कराल तेव्हा 'Process Complete'असा मेसेज स्क्रिनवर येईल.

ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ऑफलाइन देखील करू शकता. त्यासाठी आधार कार्डची प्रत, रेशन कार्डाची झेरोक्स आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्र तुमच्या जवळच्या रास्त भाव दुकानात जमा करावी.

महत्वाच्या बातम्या:
Kidney Racket : धक्कादायक : रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट; 15 जणांवर गुन्हा दाखल
याला म्हणतात यश! शेतीत केला एक बदल अन आता वर्षाला कमवतोय 10 करोड; जाणुन घ्या हा भन्नाट प्रयोग
Agri Machinary: या '2' कृषी यंत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीकामात होईल मदत, वाचेल वेळ आणि पैसा

English Summary: Breaking: Central government takes big decision on ration card
Published on: 12 May 2022, 04:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)