दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. दिवाळी (diwali festival) सुरू होण्याआधीच डाळींच्या किमती वाढल्या आहेत. तूर, उडीद आणि खाद्य तेलाच्या किमतीमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे.
आपण पाहिले तर गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या (Tur pulses) किंमतीत 4 ते 5 रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे.
सध्या उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर सणासुदीच्या दिवसात उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या डाळींचा वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर होत आहे.
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
यावर्षी अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. डाळीच्या पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. येणाऱ्या काळात डाळींचे पिकं घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.
महत्वाचे म्हणजे महागाई पाहून खाद्यतेलाच्या किंमतीही वाढण्याची भीती आहे. खाद्यतेल 3 ते 4 रुपयांनी महागले आहे. यात आणखी वाढही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय सीएनजीसह पीएनजीच्या दरातही वाढ नोंदविण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
या सगळ्याचा परिणाम सामान्यांच्या थेट जगण्यावर होतो आहे. सीएनजीचे (cng) दर वाढल्यामुळे दळणवळण महागलंय. तर दूसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरवाढीने डोकेदुखी वाढवली तर आहेच, अशातच ऐन सणासुदीच्या काळात आता डाळीदेखील महागल्याने सर्वसामान्यलोकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
12 वर्षानंतर वृषभ, मिथुन, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाचा योग; राशीभविष्य काय सांगतंय? जाणून घ्या
सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी
LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ
Published on: 10 October 2022, 09:42 IST