Others News

नुकत्याच मे महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने ( OMCs ) 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी प्रति सिलेंडर १०४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Updated on 01 June, 2022 10:36 AM IST

LPG Gas Cylinder:जून महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दराबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम व्यवसायिक सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर 135 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. नुकत्याच मे महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने ( OMCs ) 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी प्रति सिलेंडर १०४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

या दरवाढीमुळे हॉटेलमधील जेवण देखील महाग होण्याची शक्यता दर्शवली जात होती. मात्र व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता राजधानी दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडरचा दर हा 2,219 रुपये एवढा झाला आहे. आधी याच व्यवसायिक सिलेंडरसाठी 2,354 एवढी किंमत मोजावी लागत होती.

गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस व व्यवसायिक सिलेंडरच्या दरात वाढ सुरू होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आता व्यवसायिक सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिल्लीतील नागरिकांना 2,354 ऐवजी 2,219 रुपये द्यावे लागणार, कोलकात्यात आता 2,454 ऐवजी 2,322 रुपये मोजावे लागणार तर,

UPSC Result : नादच खुळा: साताऱ्याच्या शेतकरी पुत्राची यूपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी

मुंबईतील नागरिकांना 2,306 ऐवजी 2171.50 रुपये द्यावे लागणार आहेत आणि चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना विकला जाईल. एलपीजी गॅस सिलेंडर दर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या तारखेला बदलले जातात. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यात 1 मे ला यात सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत केवळ 2,012 रुपये होती. 1 एप्रिलला याचे दर 2,253 वर गेले व आता मे महिन्यात हे दर 2,355 रुपयांवर पोहोचले.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात घडली हृदय पिटाळून टाकणारी घटना; वाघ्याच्या हल्ल्यात शेतकरी राजाचा मृत्यू
प्रतीक्षा संपली; मोदींनी पाठवलेले 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; नसतील आले तर करा 'हे' काम

English Summary: Big reduction in the price of gas cylinders
Published on: 01 June 2022, 10:32 IST