सध्या शासनाच्या विविध खात्यांतर्गत आणि संरक्षण दलातर्फे विविध प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून याचा फायदा तरुणांनी अवश्य घ्यावा. कारण कोरोना कालावधीपासून गेल्या दोन ते अडीच वर्षात सगळ्या प्रकारच्या खाजगी व सरकारी क्षेत्रातील भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आल्या होत्या. परंतु आता हळूहळू सगळी परिस्थिती पूर्वपदावर येत असून विविध खात्यांच्या भरतीच्या जाहिराती सध्या निघत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील विविध सहा बँका आणि संरक्षण दलात तब्बल सात हजार पेक्षा जास्त पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये एक कॅनरा बँकेत अडीच हजार पदे भरली जाणार असून युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुद्धा 2000 पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत.
बँकिंग सोडून संरक्षण दलाचा विचार केला तर बॉर्डर सेक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफ मध्ये 323 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना बँकेत तर बारावी पास उमेदवार संरक्षण खात्यासाठी पात्र ठरणार आहेत.
बारावी पास उमेदवारांना बंपर संधी
दिल्ली सबॉर्डिनेट सर्विस सेलेक्शन बोर्डच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून यामध्ये स्टोअर अटेंडंट, जूनियर लेबर वेल्फेअर इंस्पेक्टर, डेप्युटी मॅनेजर तसेच असिस्टंट स्टोअर कीपर आणि अकाउंटंट इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी 27 ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
बीएसएफ मध्ये मोठी संधी
सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि एसआय म्हणजेच असिस्टंट सब इंस्पेक्टर या पदाच्या 323 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असून यामध्ये 18 ते 25 वयोगटातील बारावी उत्तीर्ण युवक अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी सहा सप्टेंबर पर्यंत बीएसएफच्या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.
नेव्हीमध्ये संधी
शॉर्ट सर्व्हिस कमिशन च्या माध्यमातून इंडियन नेव्ही मध्ये 50 अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असून यासाठी ची शैक्षणिक पात्रता एमएससी कम्प्युटर, बीई आणि एमटेक आयटी इत्यादी शिक्षण झालेल्या युवकांसाठी ही चांगली संधी आहे.
यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार नेव्ही मध्ये ट्रेड्समेट या पदाच्या 112 जागांसाठी अर्ज करू शकतात व यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून सहा सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
बँकेची ऑक्टोबर मध्ये परीक्षा
आयबीपीएस अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे व त्यासाठी 22 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. बँकेत फार मोठी भरती असून सहा बँकांसाठी तब्बल 6 हजार 432 प्रोबेशनरी ऑफिसर च्या जागा आहेत.
पहिली चाचणी परीक्षा आक्टोबर मध्ये व मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे व या परीक्षेचा निकाल जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 दरम्यान घोषित केला जाणार आहे. पुढे कॉमर्स मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यापुळे नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Published on: 10 August 2022, 07:55 IST