Anandacha Shidha News : आनंदाचा शिधा वाटपाबाबत राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra State Cabinet) मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीसारखाच आता गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रास्तधान्य दुकानावर ( Ration Card Holder) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे. (Maharashtra Political News) याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
100 रुपयांचा आनंदाचा शिधा
1 कोटी 63 लाख रेशनकार्डधारकांना हा 100 रुपयांचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. दिवाळीत वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधामध्ये 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ आणि 1 लिटर पामतेल या चार वस्तूंचा समावेश होता. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. दिवाळीनिमित्त शासनाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांना आनंदाजा शिधा वाटण्यात आला.
प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना, अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे 1 कोटी 62 लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला. आताही आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्त्यावर कांदा आणि द्राक्ष फेकून सरकारचा निषेध; स्वाभिमानीचे आंदोलन
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल.
पुरंदरच्या अंजीरचा जगात डंका! युवा शेतकऱ्यांच्या कंपनीची मोठी भरारी, थेट हाँगकाँगला निर्यात
ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गोरगरिबांचा सण गोड व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने या वस्तूंचे किट केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने पुढील कार्यवाही आता करण्यात येणार आहे. दरम्यान, दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ उशिराने मिळाला होता. त्यामुळे आतातरी वेळेत मिळेल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Published on: 22 February 2023, 01:10 IST