सध्या राज्यात कोरोनाचे सत्र वाढतच आहे. मध्यंतरी शिथिल झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. मुंबई महापालिकेने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
याआधी कोरोनामुळे अनेक समस्यांचा आपण सामना केला आहे. देशात लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागला होता. मात्र पुन्हा आता तीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुंबई महापालिकेचे महत्वपूर्ण निर्णय
मुंबईमध्ये कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढवण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बुस्टर डोसची संख्या वाढवण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. शिवाय वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. मालाडमध्ये असलेलं जम्बो कोव्हिड सेटंर हे प्राधान्यांना उपलब्ध होणार आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास वारंवार सांगितले जात आहे.
वॉर रुम होणार सक्रीय
कोरोना काळात मुंबईतील प्रत्येक प्रभाग कार्यालयात वॉर रुम तयार करण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आणि मदतीसाठी हे वॉर रुम तयार करण्यात आले होते. आपल्या हद्दीत कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती वॉर रुममध्ये ठेवली जाते. आता मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार, पुन्हा एकदा हे वॉर रुम सज्ज होणार आहे.
खासगी रुग्णालय सज्ज
पालिकेने खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे. खासगी रुग्णालयाने कोरोना काळातदेखील महत्वपूर्ण निर्णय घेतले होते.
आख्ख मार्केट आता आपलंय! उच्च शिक्षण घेऊन देखील पठ्या कंपनीत विकतोय फळे, करतोय लाखोंची कमाई
पुन्हा एकदा मास्क सक्ती?
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने मास्क सक्ती हटवली व मास्कचा निर्णय हा ऐच्छिक ठेवण्यात आला. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्तीची चर्चा सुरु झाली आहे. टास्क फोर्सकडून याबाबत कोणतेच निर्देश जारी केले नाहीत त्यामुळे मास्क बाबत सध्या कोणतंच बंधन नसेल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य
राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सध्या राज्यात 3,500 अॅक्टिव केसेस
आहेत. ओमायक्रॉनच्या दोन नव्या व्हेरियंटचे सातही रूग्ण बरे झाले आहेत असंही टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
अंबानी, बच्चन, तेंडुलकर आणि अक्षयकुमार हे पुणे जिल्ह्यातील 'या' डेअरीचे दूध पितात..!
पावसाळ्याच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडूंचा मोठा गौप्यस्फोट; बियाणांबाबत मोठे वक्तव्य
Published on: 02 June 2022, 12:51 IST