जर तुम्ही देखील मुलीचे वडील असाल आणि तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिदृष्टया समृद्ध व्हावे अशी तुमची इच्छा असेल. तर सुकन्या समृध्दी योजना खूप फायद्याची ठरेल. या योजनेत अद्भूत गुंतवणूक केली तर तुमची मुलगी 21 व्या वर्षात करोडपती होईल. तुम्हाला या योजनेत जास्त काही करण्याची गरज फक्त या विशेष योजनेसाठी दररोज 416 रुपये वाचवावे लागतील. दररोज 416 रुपयांची ही बचत नंतर तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपयांची मोठी रक्कम बनेल.
सुकन्या समृध्दी योजना म्हणजे काय? काय झाले त्यात बदल
सुकन्या समृध्दी योजना ही अशी दीर्घकाल योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल खात्री बाळगू शकतात. यासाठी तुम्हाला खूप पैसे गुंतवण्याचीही गरज नाही. या योजनेत अनेक मोठे बदल होत आहेत. नविन नियमांनुसार खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक आर्थिक वर्षाशेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल. पूर्वीचा नियम असा होता की, मुलगी 10 वर्षानंतर खाते चालवू शकते. परंतु नवीन नियमांनुसार, मुलीला 18 वर्षाआधी खाते वापरण्याची परवानगी मिळणार नाही.
डिफॉल्ट खात्यावर व्याजदर बदलणार नाही
खात्यात वर्षाला किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा न केल्यास, खाते डिफॉल्ट मानले जाते. परंतु नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल. पूर्वी डिफॉल्ट खाती पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज मिळविण्यासाठी वापरली जात होती.
हेही वाचा : आपका बँक (आपली बँक) या अभियानाद्वारे घरी बसून मिळेल पीएम किसान योजनेचा हप्ता
तिसऱ्या मुलीचे खातेही उघडता येणार
यापूर्वी या योजनेत 80c अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होते. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमांनुसार एका दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघांचे खाते उघडण्याची तरतूद आहे.
निर्धारित वेळेपूर्वी खाते बंद केले जाऊ शकते
सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत उघडलेले खाते पहिल्या दोन परिस्थितीमध्ये बंद केले जाऊ शकते. पहिली मुलगी मरण पावली तर दुसरी आणि मुलीचा पत्ता बदलला तर नव्या बदलानंतर खातेदाराच्या जीवघेण्या अजाराचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
Published on: 08 June 2022, 09:32 IST