Others News

सध्या रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरांमध्ये 0.50 टक्के वाढ केली आहे व या वाढीसह रेपोदरात 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. म्हणजे आता गृहकर्ज ते वाहन कर्ज किंवा पर्सनल लोन आता महाग होऊ शकतात. परंतु त्या पाठोपाठ एक दिलासादायक बातमी असून ॲक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 55 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे.

Updated on 02 October, 2022 7:29 PM IST

सध्या रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरांमध्ये 0.50 टक्के वाढ केली आहे व या वाढीसह रेपोदरात 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. म्हणजे आता गृहकर्ज ते वाहन कर्ज किंवा पर्सनल लोन आता महाग होऊ शकतात. परंतु त्या पाठोपाठ एक दिलासादायक बातमी असून ॲक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 55 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे.

नक्की वाचा:लिचीची शेती करून कमवू शकता बक्कळ पैसा, जाणून घ्या लीची शेतीचे व्यवस्थापन आणि लागवड

त्यामुळे ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना एक दिलासा मिळाला असून आता मुदत ठेवींवर या बँकेच्या ग्राहकांना अधिक व्याज मिळणार आहे. ॲक्सिस बँकेने दोन कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली असून या बाबतीत जर आपण बँकेच्या अधिकृत वेबसाईटचा विचार केला तर हे नवीन व्याजदर 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू केले जाणार आहेत.

नक्की वाचा:दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर

आता किती मिळेल व्याज?

 ॲक्सिस बँकेत आता मुदत ठेवीवर 2.75 टक्के ते 6.15 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज मिळेल. आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली व त्यामुळे ॲक्सिस बँकेने देखिले मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत.

 मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो का?

 एका आर्थिक वर्षामध्ये मुदत ठेवीवर मिळणारे व्याज 40 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.

परंतु ही मर्यादा साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी आहे. परंतु 60 वर्षावरील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एफडीमधून पन्नास हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त केले आहे. परंतु यापेक्षा जास्त उत्पन्नावर 10% टीडीएस कापला जातो.

नक्की वाचा:मोसंबी पिकासाठी आहे विमा योजना, मात्र ही कागदपत्रे आहेत आवश्यक

English Summary: axis bank growth intrest rate on fixed deposit so read detail
Published on: 02 October 2022, 07:29 IST