Petrol Diesel Price Today: देशात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. त्यातच इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडले असल्यामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आज भारतीय तेल कंपन्यांकडून (Indian Oil Companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सलग 87 व्या दिवशी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
त्यामुळे थोडाफार तरी दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे.
यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
पशुपालकांनो घाबरू नका! होमिओपॅथीमध्ये लंपी संसर्गावर चमत्कारिक उपाय, प्राणी होतायेत लगेच बरे
सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
अवघ्या 6 महिन्यात लखपती करणारी शेती! आयुर्वेदातही वाढत आहे मागणी
इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
देशात पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार पेट्रोल डिझेलचे दर कमी करणार की वाढवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Rainfall Alert: महाराष्ट्रात पावसाच्या कोसळधारा सुरूच! येत्या काही तासांत आणखी मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
शेतकऱ्यांनो एकाच शेतीत करा 4 प्रकारची शेती! कमवाल लाखो; जाणून घ्या...
Published on: 16 August 2022, 09:41 IST