Others News

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते आजवर भारतीय चलनी नोटांवर फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधींचाच फोटो छापला जात होता. मात्र पहिल्यांदाच गांधींव्यतिरिक्त या दोन महापुरुषांचे फोटो नोटांवर छापले जाणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय व भारतीय रिझर्व्ह बँकने एकत्रित येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे.

Updated on 06 June, 2022 4:46 PM IST

आपल्या भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. आता मात्र या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत दोन महापुरुषांचे फोटो झळकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी तयारीदेखील सुरु केली आहे. हे दोन महापुरुष म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक व भारतीय राष्ट्रगीताचे जनक रविंद्रनाथ टागोर आणि 'मिसाईल मॅन' म्हणून ज्यांची ओळख आहे ते भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचा समावेश असणार आहे.

महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्यासाठी वॉटरमार्क तयार
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते आजवर भारतीय चलनी नोटांवर फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधींचाच फोटो छापला जात होता. मात्र पहिल्यांदाच गांधींव्यतिरिक्त या दोन महापुरुषांचे फोटो नोटांवर छापले जाणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय व भारतीय रिझर्व्ह बँकने एकत्रित येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत लवकरच अधिकृतरित्या निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय राष्ट्रगीताचे जनक रविंद्रनाथ टागोर आणि भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचे नोटांवर छापण्यासाठी वॉटरमार्क तयार झाले आहेत. शिवाय ते सिक्युरिटी मीटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आले आहेत.

प्रा. दिलीप शहा यांनी तयार केले महापुरुषांचे वॉटरमार्क
प्रा. दिलीप शहा यांनी महापुरुषांचे वॉटरमार्क तयार केले आहेत. ते आयआयटी दिल्लीत कार्यरत आहेत. प्रा. दिलीप शहा यांचा वॉटरमार्क आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्स्टूमेंटेशन हा स्पेशलायझेशनचा विषय असून त्यांना यावर्षी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होत.

2017 पासूनची तयारी
नोटांच्या नव्या मालिकेची सुरक्षा वैशिष्ट्ये तपासण्यासाठी 2017 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक समिती स्थापन करण्यात आली. त्याचा अहवाल 2020 साली सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधींव्यतिरिक्त रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम या दोन महापुरुषांच्या वॉटरमार्कचा नोटांवर वापर करण्याच्या संकल्पनेला ग्रीन सिग्लन मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

कौतुकास्पद: काळ्या आईची सेवा केल्यामुळे शेतकऱ्याला थेट बांधावरच मिळाला पुरस्कार

कोणत्या नोटांवर होणार प्रयोग
हा प्रयोग 2000 रुपयांच्या नोटांना वगळून इतर सर्व नोटांवर केला जाणार आहे. रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा भारतीय चलनी नोटांवर छापण्यात येणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग होणार आहे त्यामुळे आता याचे काय परिणाम होणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; पुढील चार दिवस महत्वाचे,13 जिल्ह्यांमध्ये जारी केला यलो अलर्ट
आता तासंतास नंबरला बसण्याची गरज नाही; फिरत्या सलूनची होतीये राज्यभर चर्चा

English Summary: After Mahatma Gandhi, photos of 'these' people will be displayed on Indian currency
Published on: 06 June 2022, 04:46 IST