7th Pay Commission: केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट देण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (increase DA) घोषणा करणार आहे.
देशाचा किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये ७ टक्क्यांच्या खाली आला आहे. तथापि, ते अजूनही भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत सरकारकडून लवकरच डीए वाढीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.
महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी बदलतो
जानेवारीसाठी शेवटची डीए वाढ करण्याचा निर्णय सरकारने मार्च 2022 मध्ये घेतला होता. यावेळी अद्याप कोणतेही अपडेट नाही. डीए हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भाग आहे.
ज्यामध्ये सरकार दर सहा महिन्यांनी बदल करतात. जानेवारीचा डीए मार्चमध्ये जाहीर झाला. जुलैसाठी डीएबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
किरकोळ महागाई 6.71 टक्क्यांवर घसरली
मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून ३४ टक्के केला. आता पुन्हा लवकरच महागाई भत्त्यात वाढ जाहीर होणार आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 6.71 टक्क्यांवर आला आहे.
त्यानुसार महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जूनमध्ये महागाईचा दर ७.०१ टक्के होता, त्यावेळी महागाईचा दर ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती.
एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे डीए वाढीचा निर्णय घेतला जातो. जूनचा AICPI निर्देशांक 129.2 अंकांवर होता. DA मध्ये 4 टक्के वाढ केल्यास पगारात किती बदल होईल?
Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा
कमाल मूळ पगाराची गणना
1. कर्मचार्याचे मूळ वेतन रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना
4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2260/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120
Independence Day 2022: जाणून घ्या पुढच्या 25 वर्षासाठी पंतप्रधान मोदी यांचे 5 संकल्प
किमान मूळ पगाराची गणना
1. कर्मचाऱ्याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8640
Published on: 16 August 2022, 09:57 IST