Others News

7th Pay Commission: केंद्र सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकाकडून एका वर्षात दोन वेळा वाढ करण्यात येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होत असते. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी केंद्र सरकार कडून हे निर्णय घेण्यात येत असतात. आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Updated on 25 July, 2022 11:07 AM IST

7th Pay Commission: केंद्र सरकारकडून (Central Goverment) वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central employees) महागाई भत्त्यात सरकाकडून एका वर्षात दोन वेळा वाढ करण्यात येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होत असते. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी केंद्र सरकार कडून हे निर्णय घेण्यात येत असतात. आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डीएमध्ये ४ टक्के वाढ होण्याची शक्यता

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई पाहता कर्मचाऱ्यांना दिलासा देताना सरकार महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांऐवजी ४ टक्के वाढीची भेट देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. DA ची गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (AICPI) केली जाते. किरकोळ महागाई 7.01 टक्‍क्‍यांवर पोहोचली असताना, सरकार यावेळी 3 टक्‍क्‍यांऐवजी 4 टक्‍क्‍यांनी महागाई वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारीच की! MG भारतात करणार सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत कमी, लूकही जबरदस्त

महागाई भत्ता 38% होऊ शकतो

मार्च 2022 मध्ये केंद्र सरकारने महागाई दरात वाढ होईपर्यंत ती 31 वरून 34 टक्क्यांवर आणली होती. दुसरीकडे, सरकारने या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली, तर त्यांचा भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. याचा लाभ देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 35 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.

शेती करायला वावर कशाला! टेरेसवर शेती करून होऊ शकता मालामाल; जाणून घ्या...

पगार किती वाढेल

नवीन महागाई भत्ता ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर केला जाईल असे मानले जात आहे. ही घोषणा ऑगस्टमध्ये केली जाऊ शकते, परंतु ती 1 जुलै 2022 पासून प्रभावी मानली जाईल. जर आपण पगारवाढीबद्दल बोललो, तर 4% DA वाढीनंतर, तुमच्या पगारात बंपर वाढ होईल. उदाहरणार्थ, जर तुमचा किमान मूळ वेतन 18000 रुपये असेल, तर 38 टक्के महागाई भत्त्यानुसार तुमचा पगार वार्षिक 6840 रुपयांनी वाढेल. जर तुमचा मूळ पगार 56900 रुपये असेल, तर 38 टक्के DA सह, तुमचा पगार वार्षिक 27312 रुपयांनी वाढेल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो सावधान! पाऊस पडल्यानंतर तूर पिकात करा हे काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
पावसाचे सत्र सुरूच! पुढील ४ दिवस धो धो कोसळणार; आयएमडीने दिला रेड अलर्ट

English Summary: 7th Pay Commission: Good News for Central Employees!
Published on: 25 July 2022, 11:07 IST