Others News

कर्मचारी यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली होती.

Updated on 17 May, 2022 10:23 AM IST

7th pay commission: नवी दिल्ली : कर्मचारी यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र आता तो खात्यात येण्याची सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत वाढीव डीए खात्यात कधी येणार, असा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.

वाढणार पगार

आता जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, दुसरीकडे महागाई भत्त्याची गणनाही बदललेल्या पद्धतीने केली जाईल.

जुलैमध्ये पगारातील वाढीव डीए आणि - ऑनच्या माध्यमातून खात्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. अद्याप त्याची घोषणा झालेली नसली तरी. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत उच्च अधिकाऱ्यांनी यापूर्वीच बैठक घेतली आहे.

7th pay commission ! सरकारच्या 'या' निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

केंद्र आणि राज्यांच्या सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च स्तर सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जाणार आहे. हा भत्ता वेतन रचनेचा एक भाग आहे. जेणेकरून महागाई वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात फरक पडत नाही. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाते.

जमिनीचा NA म्हणजे नक्की काय? NA कसा करतात; जाणून घ्या...

English Summary: 7th pay commission: Employees' fortunes opened
Published on: 17 May 2022, 10:23 IST