Others News

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत अनेक दिवसांपासून वाढ होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत होत्या. मात्र केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. महागाई भत्त्याबाबत कोणतीही वाढ न केल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Updated on 27 August, 2022 10:29 AM IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central employees) महागाई भत्त्याबाबत अनेक दिवसांपासून वाढ होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत होत्या. मात्र केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. महागाई भत्त्याबाबत (DA) कोणतीही वाढ न केल्याचे केंद्र सरकारने (Central Government) सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

हे आदेश बनावट आहे

सरकारी धोरणे/योजनांबद्दल चुकीची माहिती तपासण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) म्हटले आहे की, 01.07 पासून महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता लागू होईल असा दावा करणारी बनावट ऑर्डर WhatsApp वर प्रसारित झाली आहे.

खर्च विभागाने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रात म्हटले आहे की, "केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता जुलैपासून मूळ वेतनाच्या सध्याच्या ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेताना राष्ट्रपतींना आनंद होत आहे.

Tomato Rate: टोमॅटो उत्पादकांचे येणार अच्छे दिन! दर पुन्हा कडाडण्याची शक्यता...

काय आहे महागाई भत्ता

महागाई भत्ता हा एखाद्याच्या पगाराचा एक घटक आहे जो महागाईमुळे राहणीमानाच्या वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी दिला जातो. DA दरवर्षी दोनदा, प्रत्येक सहामाहीत एकदा वाढवला जातो.

Subsidy On Solar Pump: शेतकऱ्यांचा होणार फायदा! सोलर पंपावर मिळतेय 60 टक्क्यांपर्यंत अनुदान

मार्चमध्ये, केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांसाठी डीएमध्ये 3 टक्के वाढीची घोषणा केली आणि हा दर सध्याच्या 34 टक्क्यांवर नेला. त्याचवेळी, वर्षातील महागाई भत्त्याचा दुसरा हप्ता अद्याप जाहीर झालेला नाही. केंद्र सरकारने कोविड दरम्यान 18 महिन्यांसाठी महागाई भत्ता गोठवला होता.

महत्वाच्या बातम्या:
Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; अलर्ट जारी
नादच खुळा! 1.51 लाखाची बैल जोड; कामठीत बैलपोळा उत्साहात साजरा

English Summary: 7th Pay Commission : Central government important information about inflation allowance
Published on: 27 August 2022, 10:29 IST