News

देशात सध्या राष्ट्रपती निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. प्रमुख पक्षाने आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. यामुळे यामध्ये कोण राष्ट्रपती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता औरंगाबाद शहरातील समाज सेवक विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरले आहे.

Updated on 25 June, 2022 5:03 PM IST

देशात सध्या राष्ट्रपती निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. प्रमुख पक्षाने आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. यामुळे यामध्ये कोण राष्ट्रपती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता औरंगाबाद शहरातील समाज सेवक विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरले आहे.

यामुळे आता या तरुणाची चर्चा सुरू आहे. हा तरुण राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची त्याची इच्छा असून संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण फॉर्म भरण्याची माहिती त्यांनी समाजमाध्यमवर प्रसारित केली. तसेच अभिजित बिचकुले देखील ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असेही बिचकुलेने सांगितले आहे.

आता औरंगाबादमधील या तरुणाची समाज माध्यम म्हणून ती फॉर्म भरल्याची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. विशाल नांदरकर हा औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात राहणारा तरुण असून नेहमीच सामाजिक कामासाठी तो नेहमीच पुढे असतो. यामुळे आता त्याला या निवडणुकीत कोण कोण मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता पंजाबरावांनी जुलै महिन्यांचा अंदाज केला जाहीर, वाचा कधी पडणार नेमका पाऊस

दरम्यान, भाजपने आदिवासी भागातील महिलेला याठिकाणी संधी दिली आहे. यामुळे आता देशाची दुसरी महिला राष्ट्रवादी म्हणून त्यांना संधी मिळू शकते. यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून पुढील अनेक गणित अवलंबून आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
एकीकडे आमदार फरार मात्र हा आमदार थेट पेरणीच्या औतावर, फोटो व्हायरल
आता चलन न कापता पाहिजे तिकडे फिरा! ड्रायव्हिंग लायसन्सपासून मिळणार सुटका
टोमॅटोने दुष्काळच हटवला! वर्षात दुहेरी उत्पादनातून शेतकऱ्याने कमवले २ कोटी ५० लाख

English Summary: Young man from Maharashtra fills up application for President's post, discussions abound ...
Published on: 25 June 2022, 05:03 IST