News

सध्या राज्यात राजकीय क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. दरम्यान,नव्याने स्थापन झालेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी बरेच निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरवले.

Updated on 16 July, 2022 9:32 AM IST

सध्या राज्यात राजकीय क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. दरम्यान,नव्याने स्थापन झालेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी बरेच निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरवले.अशाप्रकारचा अध्यादेश काढण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. ठाकरे सरकारने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरवले होते मात्र शिंदे सरकारने ही योजना रद्द केली. यामुळे शेतकरी संघटना शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे यासाठी मोर्चा काढणार होते.

परंतु घाईगडबडीत आमदार प्रकाश आबीटकर व खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचे पैसे मिळणार आहेत म्हणून सांगितले. मात्र आडसाल पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षांत दोनच वेळा पीक कर्ज मिळते. त्यामुळे यांनी थोडा गृहपाठ करून मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे होते असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लगावला. 

१ जुलै पासून प्रोत्साहनपर अनुदान प्रक्रिया सुरु होणार होती मात्र नव्याने स्थापन झालेल्या सरकारने हा निर्णय रद्द केला होता. यासठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र मंगळवारीच खासदार माने व आमदार आबीटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली लगेचच मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले.

मक्याला मिळतोय MSP पेक्षा जास्त भाव; आता शेतकऱ्यांचे नशीब बदलणार, करा वेळीच पेरणी

यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, की आमदार प्रकाश आबीटकर यांचे भाऊ व खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे पीककर्जाची उचल आणि मुदतीबाबत यांना माहिती हवी होती. महापूरग्रस्त शेतकरी हा तीन वर्षांतून दोन वेळा पीककर्ज घेतो. अभ्यास करून त्यांनी मुद्दा मांडायला हवा होता. असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागील महापुरातील नुकसानभरपाई ही ठाकरे सरकारपेक्षा अधिक देऊ असे ट्विट केले होते. मात्र प्रत्येक्षात परिस्थिती वेगळीच त्यामुळे अशा द्वीटवर आमचा विश्वास नाही, प्रत्यक्ष
अंमलबजावणी करा, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:
Organic Farming : सेंद्रिय शेतीतून 'या' शेतकऱ्याने वर्षाला घेतले 1 कोटींचे उत्पन्न ; पहा नियोजन पध्दती
LPG सबसिडी मिळत नसल्यास त्वरित करा 'हे' काम; खात्यात जमा होतील पैसे..

English Summary: 'you should have gone to meet the Chief Minister after doing some homework', says Raju Shetty
Published on: 15 July 2022, 04:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)