राज्यात काही दिवसांपासून सर्वत्र टोमॅटोच्या दरांनी उच्चांकी गाठली. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेटमधून टोमॅटो गायब झाला होता. टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं होतं. आता गेल्या २ महिन्यांपासून वाढत असलेल्या दरांनंतर आता ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
सध्या बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे किरकोळ बाजारात दर कमी होऊ लागले आहेत. १२५ ते २०० रुपयांवर गेलेले घाऊक बाजारातील दर आता ७० ते ८५ रुपयांवर आले आहेत. राज्यात जून, जुलै महिन्यांत प्रामुख्याने नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक होत होती.
आता बाजार समितीत आवक वाढली आहे. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत, कर्नाटकातील बेंगळुरू बाजार समितीत टोमॅटोची आवक नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित, दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न...
अचानक टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे ५० टक्के घट झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो ५० ते ८५ रुपये प्रतिकिलो बाजरभावाने विकला जात आहे.
मायबाप सरकार लिटरमागे 3 रुपयांचा फटका बसतोय, पशुखाद्यांच्या किमती कमी करण्याची दूध उत्पादकांची मागणी
नारायणगाव बाजार समितीत आवक वाढली नाही, पण दर पन्नास टक्क्यांनी घटले आहेत. राज्यातील अन्य बाजार समितीत आवक वाढली आहे. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो खरेदी-विक्री सुरू झाली आहे.
कांद्याचे भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले, शेतकऱ्यांना दिलासा...
'साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त आणावी, गैरव्यवहार टाळण्याची दक्षता घ्या, खरेदीमध्ये पारदर्शकता आणा'
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न, बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय..
Published on: 14 August 2023, 10:50 IST