News

तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला, सात बारा, नोंदी, आठ अ चा उतारा, मोजणी अशा गोष्टी नेहमी कानावर पडतात. परंतु अनेकांना याची सखोल माहिती नसते. आपण आजच्या लेखात आठ अ चा उतारा म्हणजे म्हणजे काय तो कसा वाचायचा याची महती घेणार आहोत.

Updated on 16 August, 2022 5:17 PM IST

तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला, सात बारा, नोंदी, आठ अ चा उतारा, मोजणी अशा गोष्टी नेहमी कानावर पडतात.  परंतु अनेकांना याची सखोल माहिती नसते. आपण आजच्या लेखात आठ अ चा उतारा म्हणजे म्हणजे काय तो कसा वाचायचा याची महती घेणार आहोत.

साधारणपणे आपल्याला सातबाऱ्यातून जमिनीची मालकी, त्या जमिनीवरील पिके,एकूण क्षेत्र, कर्ज अशा अनेक गोष्टी कळतात. पण अनेकांना आठ अ चा उतारा कळत नाही. तो कसा काढायचा हे माहिती नसते.  त्याचा काय फायदा असतो याचीदेखील माहिती नसते. पण आठ च्या उताऱ्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील जमिनींविषयी सगळी माहिती मिळते.

आपण आठ अ चा उतारा कसा वाचायचा हे पाहू. जर तुम्ही ऑनलाईन आठ अ चा उतारा काढला तर तुम्हाला सर्वात वरती:

१ डाव्या कोपऱ्यात वर्ष दिसेल.
२) उजव्या कोपऱ्यात तुम्ही ज्या दिवशी उतारा काढत आहेत त्याची तारीख येते.
३) त्यानंतर खाली डाव्या बाजूला गावाचे नाव, मध्यभागी तालुका आणि उजव्या बाजूला जिल्हयाचे नाव असते.

त्याच्या खाली सात रकाने म्हणजेच कॉलम दिले आहेत ते जसे वाचायचे आपण पाहू:

१) पहिला कॉलम : गाव नमुना सहामधील नोंद हा पहिला रकाना असतो त्यामध्ये खातेदराचा नोंद क्रमांक असतो. आणि क्षेत्र वयक्तिक आहे किंवा सामायिक आहे याची नोंदणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला जमिनीची मालकी व्यक्तिगत आहे किंवा सामायिक आहे हे कळते.

२) दुसरा कॉलम : या कॉलम किंवा रकान्यात भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक असतो. त्या कॉलममध्ये खातेदाराच नाव असते. जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्यांची नावे तिथे असतात. या कॉलममध्ये त्या व्यक्तीच्या नावावर किती आहे आणि ते कोणकोणत्या गटात आहे हे आपल्याला कळते.

३) तिसरा कॉलम : या कॉलममध्ये किंवा रकान्यात त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात किती क्षेत्र आहे हे आपल्याला कळते.

४) चौथा कॉलम : चौथा कॉलम हा आकारणी किंवा जुडीचा असतो. यामध्ये प्रत्येक जमीनीवर किती कर लावलेला आहेआपल्याला        कळते. हा कर रुपये आणि पैशात असतो म्हणजे १०. ५० रुपये. यातून आपल्यालात्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील जमीनीवर        किती कर आकारला हे कळते.

५) पाचवा कॉलम : पाचवा कॉलम हा दुमला जमिनीवरील नुकसान हा असतो.

६) सहावा कॉलम : हा स्थानिक करांचा कॉलम आहे. याचे दोन उपप्रकार आहेत. सहा ( अ ) मध्ये जिल्हापरिषदेने जमीनीवर किती       कर लावला आहे हे समजते. आणि सहा ( ब ) मध्ये ग्रामपंचायतीने किती कर लावला आहे हे कळते.

७) सातवा कॉलम : या कॉलममध्ये एकूण करांची बेरीज केलेली असते. यातून त्या व्यक्तीला किती कर भरावा लागतो हे कळते.

     सगळ्यात शेवटी व्यक्तीचे एकूण क्षेत्र, एकूण कर आकारणी दिलेली असते.

हेही वाचा:7/12 उतारा येणार नव्या रुपात ; बनावटगिरीला बसणार आळा

आठ अ चा फायदा:

१) एकाच मालकाची वेगवेळ्यात गटात असलेली एकूण जमीन कळते.

२) प्रशासनाला कर गोळा करण्यासाठी उपयुक्त

३) जमिनीची खरेदी विक्री करत असताना जमीन घेणाऱ्याला माणसाला ती जमीन नक्की कुणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते. त्यामुळे फसवणुकेलाआला बसू शकतो.

आठ अ चा उतारा कसा मिळवायचा:

१) https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जावा 

२) विभाग निवडायचा
३) आठ अ वर क्लीक करा
४) त्यांनतर जिल्हा, तालुका आणि गावावर क्लिक करायचे
५) खाते नंबर क्लीक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहायचा
६) त्यांनतर शोध म्हणजेच सर्चवर क्लिक करून तुमहाला तुमचा आठ अ चा उतारा मिळतो.

English Summary: what is the utara 8 A ? how do understand the utara ; What is the benefit
Published on: 06 August 2020, 05:23 IST