News

जर कोणी सांगितले की खोदलेली विहीर चोरीला गेली तर मात्र यावर हसू येईल. मात्र हे खरे आहे. नंदुरबारमध्ये हा प्रकार घडला असून याची सध्या चर्चा सुरु आहे. येथील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Updated on 27 July, 2022 11:08 AM IST

आपण बघतो की अनेकदा चोरीच्या घटना घडत असतात. यामध्ये घरातील मैल्यवान वस्तू, दागिने, गाडी अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. असे असताना आपल्याला जर कोणी सांगितले की खोदलेली विहीर चोरीला गेली तर मात्र यावर हसू येईल. मात्र हे खरे आहे. नंदुरबारमध्ये हा प्रकार घडला असून याची सध्या चर्चा सुरु आहे. येथील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने विहीर खोदली असा दावा त्यांनी केला. मात्र स्थानिक पुढाऱ्यांसह आश्रमशाळा प्रशासन गेल्या तीन वर्षांपासुन आश्रमशाळेत रोज टँकरने पाणी पुरवठा करत आहे. त्यामुळे आश्रमशाळेची विहीरी रात्रीतुन गायब कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही इमारत ठाणेपाडा येथे स्थित असलेल्या आश्रमशाळेची इमारत आहे.

यामध्ये तीनशे विद्यार्थी वास्तव्यास असुन शिक्षणासह त्यांच्या राहण्याची सोयही याच ठिकाणी आहे. मात्र याच ठाणेपाडा आश्रमशाळेच्या पाणी पुरवठ्यासाठी खोदलेली विहीर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नेमकी विहीर खोदली होती की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या आश्रमशाळेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 32 लाखांचा निधी वर्ग केला होता.

एका वर्षात 78 वेळा पेट्रोलचे दर वाढवले, आपचा खासदार संसदेत थेट मोदींना भिडला..

असे असताना मात्र येथील अधिकाऱ्यांना उपाययोजना राबवण्यासाठी अपयश आले आहे. येथील अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेसाठी विहीर खंदल्याच सांगत त्याला पाणीच लागले नसल्याच नमुद केले. यानंतर मात्र विहीर गायब होण्याच्या चर्चांना उधाण आले. जर अधिकारी शासकीय कागदावरती विहीर खोदली असा दावा करत असतील तर त्यांनी ती जागा दाखवलीच पाहिजे. मात्र विहीर तर गायब आहे.

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप खासदाराची निवड, शरद पवारांच्या जागी वर्णी लागल्याने राष्ट्रवादीला धक्का

येथील वसतीगृह अधिक्षकांसह सर्वच स्टाफने कधी पाण्यासाठी विहीर खंदली असे एकले सुद्धा नाही. उलट पाणी पुरवठा विभागाच्या या दाव्यानेच त्यांना धक्का बसला. यामुळे आता या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे. यामुळे फक्त कागदावरच विहीर खोदून ही चोरीला गेल्याचा दावा करणाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा
'नंदी ब्लोअर' ची कमाल, आता ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा..
भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या..

English Summary: What do you say! The dug well was stolen, Nandurbar district type...
Published on: 27 July 2022, 11:08 IST