News

भारत एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) नेहमी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि लाभदायक बनवण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत.

Updated on 08 May, 2022 10:47 PM IST

भारत एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) नेहमी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि लाभदायक बनवण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत.

या योजनाचा उद्देश शेतकरी बांधवांना (Farmers) शेती करताना त्रास सहन करावा लागू नये हाच आहे. आता मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान खत योजना (PM Kisan Khat Yojana) सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Poultry Farming Business: वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसाय आला डबघाईत; कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले

कौतुक करावे तेवढे कमीच….! बळीराजाने पक्षांसाठी मोकळे सोडले एक एकर बाजरीचे शेत

या योजनेअंतर्गत सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात. ही योजना रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी सुरु केली आहे. मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की, या योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी 11 हजार रुपयांचे अनुदान देत आहे. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळून त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकेल.

पीएम किसान खत योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना खत खरेदी करण्यासाठी शासनाकडून 11 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जात आहे. खताची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. पहिला हप्ता 6000 रुपये आणि दुसरा हप्ता 5000 हजार रुपये असणार आहे. हे दोन्ही हप्ते ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.

पीएम खत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही भारताचे रहिवाशी शेतकरी असायला हवे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे खालील आवश्यक कागदपत्रेही असली पाहिजेत.

आधार कार्ड

शिधापत्रिका

बँक खाते

मोबाईल नंबर

शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो

शेतीची कागदपत्रे जसे की, सातबारा

पंतप्रधान खत योजना

या योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी, पीएम खत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. यानंतर आपणांस वेबसाइटवरील डीबीटी या पर्यायावर क्लिक करावी लागणार आहे. तिथे आपणांस पीएम किसान पर्याय निवडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण पीएम किसान खत योजनेचा ऑनलाइन फॉर्म उघडेल. फॉर्ममध्ये विचारली जाणारी सर्व माहिती अचूक आणि तपशीलमध्ये भरावी लागणार आहे.

यानंतर, आपल्याला आपल्या आधार कार्डला रजिस्टर मोबाइल नंबर नोंदववा लागणार आहे आणि नंतर दिलेला कॅप्चा कोड भरून सर्च बटणावर क्लिक करावे लागणार आहे. अशा प्रकारे आपण या योजनेसाठी अर्ज सहजपणे भरू शकता.

English Summary: What do you say Modi government to provide Rs 11,000 to farmers for purchase of fertilizer; Read on
Published on: 08 May 2022, 10:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)