News

दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. देशभरात उष्णतेची लाट असताना आता पावसाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानुसार पुढील 5 दिवस अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Updated on 19 April, 2022 5:17 PM IST

दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. देशभरात उष्णतेची लाट असताना आता पावसाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानुसार पुढील 5 दिवस अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी त्याचवेळी गारपिटीची (Rain Forecast) शक्यता आहे.

या ठिकाणी पडणार पाऊस

राज्यात 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होईल. त्याचवेळी विजांचा कडकडाट होईल. त्याचवेळी गारपीट होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
आता माघार नाही ! दिवसा विजेसाठी 'स्वाभिमानी' न्यायालयात...
४६ कारखान्यांची धुराडी बंद; शिल्लक ऊसाचे काय?

पिकांना फटका

अवेळी येणाऱ्या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पिकाची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी : आता सोने तारण ठेवून मिळणार शेतीसाठी कर्ज
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

English Summary: Weather: Lightning strikes in the next two days in the state, possibility of heavy rain!
Published on: 19 April 2022, 05:17 IST