गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतपंप चोरीला जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. असे असताना आता इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी चोरांना अटक केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीपंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पोलिसांनी सणसर परिसरातून शेतीपंप चोरी करणारी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तसेच या चोरांकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर सणसर परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांनी गुन्हाची कबूली दिली आहे. यामध्ये शिवराज नारायण भापकर, ओंकार जितोबा निंबाळकर, महादेव विश्वनाथ जगताप, विशाल संभाजी भगत, सणसर अशी नवे आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सणसर भवानीनगर या परिसरातून शेतीपंप चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. याबाबत तपास चालू असताना पोलीस हवालदार गुलाबराव पाटील यांना माहिती मिळताक्षणी त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. यानंतर आरोपींना मुद्देमालासहित ताब्यात घेतले आहे. यामुळे आता त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे.
आनंदाची बातमी! 13 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर, तब्बल 603 कोटींहून रक्कम जमा
या चोरट्यांकडून शेतीपंप चोरी केल्यानंतर त्यामधील तांब्याची तार काढून विक्री केली जाते. यामधे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका शेतीपंप चोरीमुळे चोरट्यांना अंदाजे तीन ते चार हजार रुपयांमध्ये कॉपर विक्रीतून मिळू शकेल. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. यामुळे आरोपींना अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार बक्षीस म्हणून ५० हजार
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. लातुरे, हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, पोना किसन बेलदार, पोना अजित थोरात यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास पोना अजित थोरात हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..
आता हायगय करायची नाही! एकदा आमदार,आयुष्यभर पगार, राज्यात 653 माजी आमदार मंत्र्यांना निवृत्ती वेतन
उद्यापासुन महागाई रडवणार, खाणं-पिणं आणि वैद्यकीय सेवाही महागणार
Published on: 18 July 2022, 10:35 IST