सध्या सर्वजण शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मॉन्सून ८ जून रोजी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला.
माॅन्सूनने सोमवारी कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती. पण कालपासून माॅन्सूनने प्रगती केली नाही. माॅन्सून तीन दिवसांपासून एकाच ठिकाणावर ठाण मांडून आहे.
यामुळे मान्सून पुढे सरकताना दिसत नाही. बिपरजाॅय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. उद्या सायंकाळी गुजरातमधील जखाऊ बंदरावर हे चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम देखील मान्सूनवर होत आहे.
LiGHT अकोल्याच्या सदस्यांचा बाभुळगाव येथील 'कृषोन्नती' कार्यक्रम यशस्वी
या चक्रीवादळामुळे गुजरात आणि शेजारच्या भागांमध्ये वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. मग माॅन्सूनची वाटचाल अडखळली आहे. यामुळे आता ही वाट पुढे कधी सरकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल, शेतकरी सुखावला...
सध्या हे चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराच्या उत्तर नैऋत्यला २८० किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची जवळच्या जखाऊ बंदराजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे.
५५०० रुपये लिटरला गाढवाचे दूध विकणारा हा माणूस झाला करोडपती
शेतकऱ्यांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...
उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी, पिलांची मर वाढली..
Published on: 15 June 2023, 09:45 IST