News

बारामती तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांना जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असूनही पाणी मिळत नाही. याबाबत बारामती दौऱ्यावर असलेले विजय शिवतारे यांनी याबाबत मागणी केली आहे. आपल्याला पाणी मिळावे अशी कळकळीची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

Updated on 28 March, 2023 11:00 AM IST

बारामती तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांना जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असूनही पाणी मिळत नाही. याबाबत बारामती दौऱ्यावर असलेले विजय शिवतारे यांनी याबाबत मागणी केली आहे. आपल्याला पाणी मिळावे अशी कळकळीची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून याप्रश्नी उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार तत्काळ बैठक आयोजित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले. शिवतारे हे दोन दिवसीय बारामती तालुक्यातील दुष्काळी (drought) गावांच्या गावभेट दौऱ्यावर होते.

असे असताना मात्र, दौरा करत असतानाच त्यांची मुंबईत बैठक लागल्यामुळं त्यांना जावे लागले. दुर्दैवाने हा प्रकल्प सुरु झाल्यापासून आजतागायत पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात आले नाही. मंजूर क्षमतेच्या केवळ 20 ते 30 टक्के पाणी उचलण्यात आजपर्यंत जलसंपदा विभागाला यश आल्याचे शिवतारे यांनी निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 12 कोटींचा रेडा पाहण्याचा मोह! शेतकऱ्यांचे केले कौतुक..

बारामती तालुक्यातील सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, राजबाग, भोंडवेवाडी, आंबी खुर्द खंडूखैरेवाडी, मांगोबावाडी, चांदगुडेवाडी, वढाने, दंडवाडी, पानसरेवाडी, काळखैरवाडी, नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, खोर, उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी क.प. सोनवडी, सुपे, बऱ्हाणपूर, गोजूबावी, कारखेल, जळगाव सुपे, अंजनगाव, साबळेवाडी, शिर्सुफळ गाडीखेल इत्यादी गावे ही जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असल्याचे विजय शिवतारेंनी पत्रात म्हटले आहे.

या गावांसाठी 3.47 टीएमसी पाणी खडाकवासला धरण श्रृंखलेत राखीव आहे. मंजूर क्षमतेच्या केवळ 20 ते 30 टक्के पाणी उचलण्यात आजपर्यंत जलसंपदा विभागाला यश आल्याचे शिवतारे यांनी निदर्शनास आणून दिले.

'२ वर्षात राज्यात २२ जिल्हयात १०२५८ मुकादमांकडून ४४६ कोटींची वाहतूकदारांची फसवणूक'

साखर कारखाने आणि पाणीवापर संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावून पाण्याचे वाटप केले जाते. पण या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे शिवतारेंनी म्हटलं आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा..
गुलाबी बटाट्याच्या शेतीत आश्चर्यकारक नफा, अवघ्या 80 दिवसांत शेतकरी होणार श्रीमंत!
आडसाली ऊस केला तर ३० टनाचे उत्पादन ५५ टनावर निश्चित जाईल, त्यासाठी मानसिकता बदला- अजित पवार

English Summary: Vijay Shivtare recognized the vein of Baramatikars, made a big demand to the Chief Minister for the farmers.
Published on: 28 March 2023, 11:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)