गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) निवडणुकीबरोबरच विधान परिषेदेच्या निवडणुकीनेही ( Vidhan Parishad Election ) जोर धरला आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, यातच आता विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.
यामध्ये आता भाजपमध्ये जोरदार तयारी अनेकांनी केली आहे. यामध्ये भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. यामुळे थोडक्यात पराभव झालेले हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागणार का याची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे. राज्यसभेवर देखील त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहे. यामुळे आता तरी संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून 7 जणांची नावं चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde), हर्षवर्षन पाटील, माजी मंत्री राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, गोपाल आग्रावाल ही नावे चर्चेत आहेत. आगामी निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने तयारी केल्याचे समजत आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. भाजपची नावे ठरली असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे.
शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस शिवून दिल्याबद्दल दादा तुमचे आभार
यामुळे पक्ष नेमकं कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता त्याचं नाव आघाडीवर आहे. पंकजा मुंडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे विधान काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यामुळे त्यांचे नाव देखील आघाडीवर आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भाजपकडून चार जणांना सहज विधान परिषदेवर संधी मिळू शकते.
मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...
असे असले तरी मात्र पाच जणांना विधान परिषदेवर पाठवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यामुळे आता कोणाला संधी मिळणार हे लवकरच समजेल. राष्ट्रवादीकडून देखील अनेकजण इच्छुक आहेत, मात्र राष्ट्रवादीचे बडे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
चंद्रपुरात अख्खं मार्केट आपलय..! शेतकऱ्यांची मॉलमधून शेतीमालाची विक्री, शेतकरीच झाले व्यापारी
ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण, घटनेने राज्यात खळबळ
पुणतांब्यानंतर शेतकरी आंदोलन राज्यभर पसरले, आता क्रांती होणारच...
Published on: 04 June 2022, 12:49 IST