News

Lumpy Skin Disease: देशात लम्पी (Lumpy) रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालकांची (Cattle breeder) चिंता वाढली आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील लम्पी त्वचा रोगाची जनावरे अनेक जिल्ह्यांमध्ये आढळून आली आहेत. जनावरांचा मृत्यू (Death of animals) झाल्यास सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

Updated on 27 September, 2022 2:09 PM IST

Lumpy Skin Disease: देशात लम्पी (Lumpy) रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालकांची (Cattle breeder) चिंता वाढली आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील लम्पी त्वचा रोगाची जनावरे अनेक जिल्ह्यांमध्ये आढळून आली आहेत. जनावरांचा मृत्यू (Death of animals) झाल्यास सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

असे असताना खबरदारी म्हणून 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. यामुळे बैलांची किंमत कमी होईल, असेही म्हटले जात आहे.

प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करून काही अटी शर्ती घालून परवानगी द्यावी अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत. दरम्यान, देशात गुरांवर लम्पी त्वचारोगाचा धोका वाढत आहे. देशात आतापर्यंत 75 हजारांहून अधिक गुरांचा लम्पी विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १८७ जनावरे या आजाराला बळी पडली आहेत. राज्यात लम्पी विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे.

दुबईमधील लाखो रुपयांची नोकरी सोडून केली स्ट्रॉबेरीची शेती, आज कमवतोय लाखो, एकाच पिकात घेतली तीन पिके..

लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार सतर्क झाले आहे. या रोगामुळे होणाऱ्या नुकसानीपासून पशुपालक व शेतकरी वाचवण्यासाठी शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या आजारापासून गुरांना वाचवण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

बातमी कामाची! शेतकऱ्यांनो बोगस खते कशी ओळखायची? वाचा साधी सोप्पी पद्धत

सध्या देशभरात लसीकरणाला वेग आला आहे. लम्पी रोगाने गुरांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लम्पी त्वचारोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून (Administration) जिल्हास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मात्र शेतकरी चिंतेत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
२४५० रुपये FRP बसत असताना २५०० रुपये भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर देणार
ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक
भाजप नेत्याला मोठा धक्का! 28 वर्षांनंतर साखर कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे

English Summary: vaccinated bulls allowed race? Demand bullock cart drivers
Published on: 27 September 2022, 02:09 IST