वाशिम : खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच खत बियाणांचा विषय चर्चेत आला आहे. सध्या राज्यात खत बियाणांबाबत शेतकऱ्यांची बरीच लूट केली जात आहे. आतापर्यंत बऱ्याच कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून त्यांच्यावर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करुन बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यात बऱ्याच कृषी केंद्रांचे परवाने रद्ददेखील करण्यात आले. शेतकऱ्यांची लूट थांबावी यासाठी सरकार सज्ज झाले आहे. यंदा पाऊस लांबणीवर गेला आहे.
काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी काही भागात उन्हाचा तडाखा कायम आहे. पावसाअभावी खरीपाच्या पेरणीचे काम रखडले आहे. खत टंचाईच्या समस्येला शेतकरी आधीच सामोरे जात आहे. त्यातल्या त्यात कृत्रिम खत टंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र वाशिममध्ये मनसेने या बियाणांबाबत अनोखे आंदोलन केलं की ज्याची राज्यभरात चर्चा होत आहे.
मनसेने थेट जिल्हाधिकार्यांनाच शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताची टंचाई दूर करण्याची मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली. कृषी विभागाने खत आणि बियाणांची जेवढी मागणी आहे तेवढा त्याचा पुरवठा केला असल्याचे स्प्ष्ट केले होते. मात्र वास्तविक चित्र वेगळंच पाहायला मिळाले. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र तयार करण्यात आले. म्हणजेच लिंकिग पध्दतीचा वापर करून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार चालू होता.
आधीच पावसामुळे शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे त्यात भर म्हणजे कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची होत असलेली लूट. त्यामुळे आक्रमक मनसे पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवून शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी मनसे पदाधिकार्यांनी केली.
कृषी विभागाने रासायनिक खताचा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केला असल्याचे सांगितले. मात्र तरीही खताची टंचाई कशी निर्माण झाली असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना लुटत आहे. आणि याबाबत शेतकरी पूर्णतः अनभिज्ञ आहे. कृषी विभागाचा कृषी सेवा केंद्रांवर तेवढा धाक राहिलेला नाही. त्यामुळे मनसे पदाधिकार्यांनी अशा अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. आता या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची लूट होणे थांबणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. बऱ्याचदा काळजी घेऊन देखील शेतातील उत्पादनात घट होते.
मोदी सरकारचा प्लॅस्टिक बंदीचा अॅक्शन प्लॅन तयार; या वस्तू वापरल्यास होणार कारवाई
घट होण्यापाठीमागे बरीच कारणे असतात. सध्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा वापर चांगलाच महागात पडला आहे. बोगस बियाणे वापरल्यामुळे बऱ्याच नुकसानीला शेतकरी सामोरे जात आहेत. बोगस बियाणांमुळे त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जारी केल्या.
महत्वाच्या बातम्या:
Happy Father's Day : बाप बाप असतो, त्याच्या पेक्षा मोठा देव पण नसतो..!!
'एक दिवस बळीराजासोबत'
Published on: 19 June 2022, 12:07 IST