News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांचे कारखाने आणि त्यांची चौकशी देखील केली जात आहे. यातच सोलापूरमध्ये आयकराच्या धाडी पडल्याने खळबळ उडाली होती. साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील आणि सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलचे प्रमुख बिपीन पटेल यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे पडले होते.

Updated on 09 September, 2022 6:07 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांचे कारखाने आणि त्यांची चौकशी देखील केली जात आहे. यातच सोलापूरमध्ये आयकराच्या धाडी पडल्याने खळबळ उडाली होती. साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील आणि सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलचे प्रमुख बिपीन पटेल यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे पडले होते.

यामध्ये या छाप्यात 100 कोटीहून अधिक रक्कमेची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. तसेच 43 कोटी जप्त करण्यात आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्टला वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या अभिजीत पाटील आणि बिपीन पटेल यांच्याशी निगडीत ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली.

यामध्ये 20 हून अधिक ठिकाणी हे छापे पडले. महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही कारवाई झाली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले आहेत. हे सगळे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये बोगस खर्चाचे बुकिंग, अघोषित रोख विक्री, अस्पष्ट कर्ज, क्रेडिट नोंदी आहेत.

कास पठारावरील फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू, पर्यटक खुश

तसेच 15 कोटीपेक्षा जास्त साखरेच्या बेहिशेबी रोख विक्रीचे कागदोपत्री पुरावे सापडले आहेत. यामध्ये आतापर्यंत 50 कोटींहून अधिकचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. 100 कोटी पुढे अघोषित मालमत्ता सापडली आहे. 5 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हमीभावाच्या कायद्यासाठी दिल्लीत देशातील शेतकरी मैदानात, राजू शेट्टी म्हणाले तिकीट बुक करा..

यामुळे आता इतर अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अनेकांच्या चौकशा सुरु आहेत. यामुळे अनेकजण जेलमध्ये देखील गेले आहेत. प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्टला वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या अभिजीत पाटील आणि बिपीन पटेल यांच्याशी निगडीत ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली.

महत्वाच्या बातम्या;
पतसंस्थाना सीबील लागू होणार? राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी..
शेतकऱ्यांचा दुष्काळच हटणार! उसाला 3600 रुपये दर करा, राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी
देशाचे आयटी हब संकटात! पावसाचा हाहाकार, घरात बाहेर सगळीकडे पाणी, हॉटेलमध्ये ४० हजार भाडे..

English Summary: Unaccounted assets worth 100 crores, seized crores of rupees, excitement in Solapur...
Published on: 09 September 2022, 06:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)