गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. महाराष्ट्र, बिहार मध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत. असे असताना आता दिल्लीत देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऑपरेशन लोटस'च्या मुद्द्यावरून गुरुवारी दिल्लीत राजकीय गदारोळ सुरूच आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.
ज्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 9 आमदार पोहोचले नाहीत. मात्र, सिसोदिया यांच्याबाबत पक्षाने सांगितले की, ते हिमाचल दौऱ्यावर गेले आहेत. त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष हायकमांड काही आमदारांशी संपर्कही करू शकत नाही. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भाजप या आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
बैठकीनंतर केजरीवाल राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले- भाजप आमच्या 40 आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिली जात आहे. भाजपला 800 कोटी खर्च करून दिल्ली सरकार पाडायचे आहे. 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला 62 आणि भाजपला 8 जागा आहेत.
इतर आमदार एकमेकांवर तुटून पडले, पण 'या' आमदाराचे होतेय कौतुक, धक्काबुक्की होताच पळत आले आणि..
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. यानंतर ते राजघाटावरील महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचले. तेथे अरविंद केजरीवाल म्हणाले की, आता आम्ही गांधीजींना प्रार्थना केली आहे की देशात शांतता नांदावी. ते म्हणाले की, सध्या देशात सरकार पाडण्याचे वातावरण सुरू आहे.
मंत्रालयावर दोन तरुण आत्महत्या करण्यासाठी गेले, राष्ट्रवादीच्या आमदाराने धावत जाऊन वाचवला जीव...
सध्या आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आता मोदींच्या बालेकिल्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याठिकाणी अनेक आश्वासने दिली आहेत. यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
एकापाठोपाठ एक असे चार कारखाने घेतले, कारवाईने राज्यात खळबळ
आमदारांच्यात धक्काबुक्की सुरु होताच नितेश राणेंनी काढला पळ? व्हिडिओ व्हायरल..
ठाकरेंनी डावलले आता शिंदे देणार बळ! सेनेच्या वाघाची होणार सभागृहात एन्ट्री
Published on: 25 August 2022, 03:52 IST