News

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमी झाले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. असे असताना आता खतांचे दर आणि इतर शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. यामुळे शेती नेमकी कशी करायची असा प्रश्न निर्माण होत आहे.

Updated on 01 June, 2022 6:04 PM IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमी झाले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. असे असताना आता खतांचे दर आणि इतर शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. यामुळे शेती नेमकी कशी करायची असा प्रश्न निर्माण होत आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागणार आहे. नाहीतर परिस्थिती अजूनच बिघडेल.

आता तर शेतकरी कांदा घेऊन बाजारपेठेमध्ये दाखल झाले तरी व्यापारी त्याकडे पाठ फिरवून बसत असत आहेत. मनमाड येथे असेच काहीसे घडले आहे. गोल्टी कांद्याकडे नाक मुरडत व्यापार्‍यांनी या कांद्याला कवडी मोल भाव दिला होता. शिवाय उपकार केल्यासारखे खरेदी केली होती. यामुळे नक्की कांद्याचा मालक कोण आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

यामुळे एका शेतकऱ्याने व्यापाऱ्यांना हिसका दाखवत एक युक्ती लढवली आहे. शेतकर्‍यांनी एकत्र येत चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच कांदा थेट व्हिएतनामला निर्यात केला. ज्या ठिकाणी गोल्टी कांदा फुकटात देण्याची वेळ आली तिथेच आता २० किलो असा दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे.

केंद्राप्रमाणेच राज्याचे निर्यात धोरण; निर्यातीवर दिला जाणार भर

गोल्टी कांद्याला भाव मिळत नसल्याने मनमाडमधील तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांच्याकडील कांदा गोळा केला आणि दोन कंटेनर भरून व्हिएतनामला निर्यात केला. याबाबत शेतकऱ्यांच्या मनात भीती होती, की याला काय बाजार मिळेल, मात्र त्याठिकाणी 20 रुपये दराने कांदा विक्री झाला आहे.

लॉकडाऊनबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, कोरोना रुग्णसंख्या वाढली

यामुळे आता व्हिएतनामसह इतर देशांत अजून ८ ते १० कंटेनर पाठविण्यात येणार असल्याचे कच्छी यांनी सांगितले. यामुळे व्यापाऱ्यांना चांगलाच धडा बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र आल्यास काय होऊ शकते, हे दिसून आले आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता तुमची गाडी कधीच पंम्चर होणार नाही, जाणून घ्या सविस्तर
कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन, बाजारात सध्या सर्वाधिक मिळतोय दर
आता ड्रोनच्या सहाय्याने होणार सामानाची डिलेव्हरी, देशातील पहिला प्रयोग यशस्वी

English Summary: traders sell onions, farmers showed a jerk, farmers same experiment
Published on: 01 June 2022, 06:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)