News

सध्या शेतकरी शेतात वेगवेगळ्या प्रकारे शेती करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. असे असताना तुम्ही चिनाराच्या झाडांची लागवड केली तर तुम्हाला खूप जास्त कमाई करता येईल. यामुळे अनेक शेतकरी मोठे झाले आहेत.

Updated on 09 May, 2023 11:48 AM IST

सध्या शेतकरी शेतात वेगवेगळ्या प्रकारे शेती करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. असे असताना तुम्ही चिनाराच्या झाडांची लागवड केली तर तुम्हाला खूप जास्त कमाई करता येईल. यामुळे अनेक शेतकरी मोठे झाले आहेत.

परदेशातही याला प्रचंड मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झाडाचे लाकूड वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येते. यामुळे याची मागणी कधी कमी नाही होत. चिनार वृक्षांची लागवड फक्त भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागात करण्यात येते.

आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशांमध्ये चिनार वृक्षांची लागवड केली जाते. या झाडाचा वापर कागद, हलके प्लायवूड, चॉप स्टिक्स, पेटी, माचीस इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. यामुळे त्याला सतत मागणी असते.

गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

याच्या लागवडीसाठी शेतातील माती 6 ते 8.5 pH दरम्यान असणे गरजेचे आहे. समजा तुम्ही चिनाराची झाडे लावल्यास एका झाडापासून दुस-या झाडाचे अंतर 12 ते 15 फूट इतके असावे हे लक्षात ठेवा.

या झाडाच्या लाकडाची 700 ते 800 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली जात आहे. यामध्ये दर वाढू देखील शकतो. हे लाकूड 2000 रुपयांपर्यंत सहज विकले जाते.

गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

एक हेक्टरमध्ये 250 झाडे लावता येत असून जमिनीपासून झाडाची उंची एकूण 80 फूट इतकी असते. तुम्ही 7 ते 8 लाख रुपये सहज कमावू शकता. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेतकरी सध्या या झाडाची लागवड करत आहेत.

पुण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता! पुढचे चार दिवस महत्वाचे
अतिवृष्टीचा पंचनामा करण्यास नकार, कृषीमंत्र्यांनी थेट निलंबनच केलं..
आता मजुरांनाही मिळणार विम्याचा लाभ, जाणून घ्या...

English Summary: This tree will change the fate of farmers! Plant and become a millionaire…
Published on: 09 May 2023, 11:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)