राज्य सरकारच्या सेवेतील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता लवकरच मिळणार असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
यामध्ये राज्य सरकारी तसेच जिल्हा परिषद आणि पालिका कर्मचारी यांना 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. 2019 20 पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात थकबाकी देण्याचा निर्णय झाला आहे. कर्मचार्यांची ही थकबाकी भविष्य निर्वाह निधीत जमा केले जाते तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी रोखीने दिली जाते. यामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या सुमारे 32 हजार कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम आहे.या थकबाकीचा पहिला हप्ता जुलै 2019 मध्ये दिला गेला होता.
त्यातील दुसरा हप्ता 2020 मध्ये मिळणारा होता पण कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे दुसरा हप्ता 2021 मध्ये मिळाला. आता आर्थिक परिस्थिती चांगली सुधारणा होत असल्यामुळे शासकीय कर्मचारी थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे 22 फेब्रुवारी रोजी वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली व या बैठकीत महासंघाने थकबाकीची आग्रही मागणी केली होती. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी चा तिसरा हप्ता देण्याचे मान्य केल्याचे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Published on: 09 May 2022, 10:11 IST