महाराष्ट्रात अमली पदार्थाचे उत्पादन आणि वितरण कायद्याने प्रतिबंधित करण्यात आले आहे. मात्र, उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने काही शेतकरी राज्यात गांजा अथवा अफूची लागवड करीत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात अफूची शेती आढळून आली होती आता पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात देखील अफूची लागवड बघायला मिळाली आहे.
सिन्नर तालुक्याच्या वावी जवळील फुले नगर येथे एका शेतकऱ्याने एक गुंठे क्षेत्रात अफू लावला. पोलिसांना याबाबत माहिती होताच त्यांनी धडक कारवाई करत 130 किलोचा अफू ताब्यात घेतला आहे.
सिन्नर तालुक्यातील वावी पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणार्या मौजे फुले नगर येथे विलास कृष्णाजी अत्रे या शेतकऱ्यांने अफूची लागवड केली असल्याची धक्कादायक माहिती वावी पोलीसांना गुप्त सूत्रांनी दिली होती.
या अनुषंगाने वावी पोलिसातील सहायक निरीक्षक सागर कोते यांनी सर्वप्रथम माहिती खरी आहे की खोटी याबाबत चौकशी करून घेतली. माहिती खरी असल्याची पुष्टी झाल्यानंतर कोते यांनी आपल्या वरिष्ठांना या संदर्भात सूचित केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोते यांना सूचना केल्या प्रमाणे कोते यांनी 18 तारखेला अर्थात काल आपला ताफा जोडीला घेऊन अत्रे यांच्या वावरात धडक कारवाई करत अफूचे पीक उद्ध्वस्त केले. पोलीस अधिकाऱ्यांसमवेत या कारवाईमध्ये वन विभागातील अधिकारी देखील सामायिक झाले होते.
वावी ते नांदूर शिंगोटे या रस्त्यापासून आत एक गुंठे अफूची शेती पिकविली गेली होती. सदरील अफूची शेती आगामी काही दिवसात काढणीसाठी तयार होणार होती असं सांगितले गेले आहे. अत्रे यांनी अफूची लागवड सहजासहजी कोणाला सापडू नये यासाठी रस्ता असलेल्या तिन्ही बाजूने मक्याचे पीक लावले होते.
तिन्ही बाजूने मका आणि एकीकडे कांदा लावून मध्ये अफूची शेती केली जातं होती मात्र आता हा प्रकार उघड झाला आहे. कारवाईत पोलिसांनी 160 किलो अफू जप्त केला आहे. पोलिसांच्या मते या अफूची अंदाजित किंमत दोन लाख 60 हजार एवढी आहे. या प्रकरणात आरोपी शेतकरी विलास ठाकरे यांच्यावर भारतीय दंड संहिता अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात असल्याचे सांगितले गेले आहे.
संबंधित बातम्या:-
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची निराशा केली; आता पाच तारखेला कठोर निर्णय घेऊ: राजू शेट्टी
मोठी बातमी! इफको अजून 4 नॅनो युरिया प्लांट सुरु करणार; खत टंचाई दुर होणार का?
Published on: 19 March 2022, 01:29 IST