सध्या राज्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरु झाली आहेत. यावेळी उन्हाळा अधिक तीव्र असल्याने शेतकरी कधी पाऊस पडणार याकडे लक्ष देऊन होते. असे असताना आता काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. असे असताना आता कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन केले आहे.
ते म्हणाले, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका, यंदा 99 टक्के पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मान्सून वेळेपूर्वीच राज्यात दाखल होत आहे, पण पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असेही दादाजी भुसे म्हणाले. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर बियाणे, खते व मेहनत वाया जाते. त्यामुळे घाई करु नका, असेही ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांनी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी.
सध्या काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. यावेळी चांगला पाऊस पडेल असेही सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारी सध्या सुरु आहे.
पुराच्या पाण्यात पाय भिजतील म्हणून भाजप आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर
दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. यामुळे यंदा जास्त पाऊस पडेल.
यावर्षी देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी जिल्हानिहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना कशाची कमी पडू नये असे आदेश कृषीमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले आहेत. यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी आता योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
आताची सर्वात मोठी बातमी! पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारने थेट तारीखच सांगितली..
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...
मोठी बातमी! एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश
Published on: 21 May 2022, 12:36 IST