News

शेती व्यवसायाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शेती विकासासाठी अनेक कृषी शास्त्रज्ञ, अभियंते, तसेच तरुण शेतकरी वर्ग प्रयत्न करत आहेत. सध्या तरुण वर्ग शेतीत क्रांती घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

Updated on 04 August, 2022 3:48 PM IST


शेती व्यवसायाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शेती विकासासाठी अनेक कृषी शास्त्रज्ञ, अभियंते, तसेच तरुण शेतकरी वर्ग प्रयत्न करत आहेत. सध्या तरुण वर्ग शेतीत क्रांती घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत. असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पहिले, शेतकऱ्यांच्या समस्या जगासमोर आणल्या तसेच सेंद्रिय शेतीची जनजागृती केली.

ते व्यक्तिमत्व म्हणजे नीरज प्रजापती. नीरज प्रजापती यांना 'द इंडियन एग्रीकल्चर सायकल मॅन' म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपला बीटेक कोर्स अर्धा सोडला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सायकल प्रवास सुरु केला. नीरज प्रजापती यांनी हरियाणातून सायकलवरून प्रवास सुरुवात केली.

यातून त्यांनी शेतकर्‍यांना रासायनिक खतांचा वापर थांबवण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याबाबत जागरूक केले. 26 वर्षीय निरजने 1 लाख 11,111 किमी सायकल चालवली आहे. त्यांना द मॅन ऑफ सायकल अॅग्रीकल्चर इंडिया म्हणूनही ओळखले जाते.

मंगळवारी कृषी जागरणमध्ये आलेल्या नीरजचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी जागरणाचे संपादक आणि संस्थापक एम सी डॉमिनिक तसेच इतर सदस्य टीम आणि कृषी पत्रकार उपस्थित होता. यावेळी नीरज प्रजापती यांनी गावातल्या छोट्या शेतकऱ्यांना पुढे आणण्यावर भर द्या तसेच त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ब्रेकिंग! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नीरजने 9 एप्रिल 2019 पासून या सायकल प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत 44 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. हरियाणातून प्रवास सुरू केल्यानंतर निरजने राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या जिल्ह्यांमध्ये पोहोचून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले आहे.

कीटकनाशकांच्या वापरामुळे विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी नष्ट होऊ लागल्यावर निरजने बीटेक अभियांत्रिकी अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडून काहीतरी वेगळे करण्याचा विचार सुरू केला. पाचव्या सेमिस्टरमधून बाहेर पडल्यानंतर प्रजापतीने करिअरची चिंता न करता सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने सायकल ट्रिप सुरू केली.

महत्वाच्या बातम्या:
सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना संसद विशिष्टरत्न पुरस्कार प्रदान
Milk Fat: 'या' उपाययोजना करा आणि वाढवा दुधातील फॅट,तरच येईल घरी आर्थिक गंगा

English Summary: 'The Indian Agriculture Cycle Man' Neeraj Prajapati's visit to Krishi Jagran
Published on: 04 August 2022, 03:48 IST