News

गेले कित्येक महिने कांद्याला योग्य मिळत नव्हता. त्यामुळे हतबल होऊन शेतकऱ्यांनी कांद्यावरून रोटर फिरवला तर काहींनी जाळून टाकला तर काहींनी त्यात जनावरे सोडली. यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बरेच हाल झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीही शेतकरी चांगले उत्पादन मिळवून नफा मिळवत आहेत.

Updated on 03 July, 2022 3:04 PM IST

सध्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असताना पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सजवलेली बैलगाडी आणि पुढे ढोल-ताशाचा गजरात कांद्याच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. कांद्याची जंगी मिरवणूक पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. संबळाच्या तालावर दाखल झालेल्या या कांद्याचे सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्यात आले आहे.

गेले कित्येक महिने कांद्याला योग्य मिळत नव्हता. त्यामुळे हतबल होऊन शेतकऱ्यांनी कांद्यावरून रोटर फिरवला तर काहींनी जाळून टाकला तर काहींनी त्यात जनावरे सोडली. यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बरेच हाल झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीही शेतकरी चांगले उत्पादन मिळवून नफा मिळवत आहेत. निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करत चांगले उत्पादन मिळवले आहे.

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी निफाड तालुक्यातील मौजे सुकेणेच्या श्याम मोगल व ओझर येथील दिगंबर कदम शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. कांदा आपल्या रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सुकेणेच्या श्याम मोगल आणि ओझर येथील दिगंबर कदम या दोन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर न करण्याचे ठरवले.

आजकाल सगळं काही भेसळयुक्त होत चालले असताना या दोन शेतकऱ्यांनी उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. खरंतर बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत जातो त्यामुळे नाईलाजास्तव रासायनिक फवारणी करावीच लागते. मात्र या शेतकऱ्यांनी यावर देखील मात केली आहे. रासायनिक पद्धतीने कांद्याची लागवड केली जाऊ शकते हे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी अशी जंगी मिरवणूक काढली.

Goat Care: शेळीपालनात आहात तर पावसाळ्याआधी शेळ्यांना दया 'या' लसी,आजार राहतील दूर

सेंद्रिय पद्धतीमुळे आरोग्यालाही बरेच फायदे आहेत. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे त्यांच्या उत्पादनातही वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सध्या बाजारात सेंद्रिय कांद्याला चांगला दर मिळत आहे. नियमित कांद्याला 500 ते 1000 रुपये असा सरासरी क्विंटलचा दर आहे. असे असताना सेंद्रिय कांद्याला 1750 रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे.

महत्वाच्या बातम्या:
पंजाबमध्ये बल्ले बल्ले ! महिन्याला 300 युनिट मोफत वीजेची योजना सुरू; शिंदे सरकार घेणार का असा निर्णय?
मोठी बातमी : शिवसेनेतून 'या' माजी खासदाराची हकालपट्टी; कारण...

English Summary: The farmer took out a procession of onions; Read exactly what the case is
Published on: 03 July 2022, 03:04 IST