News

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न (Black Wheat Production) घेतले आहे. विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्यानं नागरिक बाहेरुन हा गहू विकत आणतात.

Updated on 28 March, 2023 1:17 PM IST

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न (Black Wheat Production) घेतले आहे. विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्यानं नागरिक बाहेरुन हा गहू विकत आणतात.

राजेश डफर यांनी एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचं उत्पादन घेतलं आहे. या काळ्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यानं पोटाचे विकार होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट इथे काळ्या गव्हाचे बियाणे मिळाले. त्यांनी सुरुवातीला 40 किलो बियाणे आणून त्याची एक एकर शेतीमध्ये पेरणी केली.

एक एकरात त्यांना 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले. सध्या बाजारात काळ्या गव्हाला किलोला 70 रुपयांचा दर मिळत आहे. काळ्या गव्हामुळं ही पौष्टीकतत्वे रोजच्या आहारातून अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळं वर्धा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने काळ्या गव्हाची लागवड करुन आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून चांगली कमाई केली आहे.

'२ वर्षात राज्यात २२ जिल्हयात १०२५८ मुकादमांकडून ४४६ कोटींची वाहतूकदारांची फसवणूक'

कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींमध्ये गहू उपयुक्त आहे. याशिवाय काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिड असतात. त्यामुळं या गव्हाचे पोषणमूल्य अधिक आहे.कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींमध्ये गहू उपयुक्त आहे.

आडसाली ऊस केला तर ३० टनाचे उत्पादन ५५ टनावर निश्चित जाईल, त्यासाठी मानसिकता बदला- अजित पवार

काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिड असतात. त्यामुळं या गव्हाचे पोषणमूल्य अधिक आहे.

विजय शिवतारेंनी बारामतीकरांची नस ओळखली, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी..
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा..
गुलाबी बटाट्याच्या शेतीत आश्चर्यकारक नफा, अवघ्या 80 दिवसांत शेतकरी होणार श्रीमंत!

English Summary: The farmer has grown black wheat, getting a price of 70 rupees per kilo
Published on: 28 March 2023, 01:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)