News

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात पडत आहे.

Updated on 30 March, 2022 8:11 AM IST

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात पडत आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन देशांचा जर विचार केला तर हे दोन्ही देश प्रमुख गहू निर्यातदार देश आहेत. परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळे या दोन देशांमधील गहू निर्याततिच्या अपेक्षा जवळजवळ नाहीत जमा आहेत. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्य पंजाब मधील शेतकरी आणि अडते यांना मिळणार याची दाट शक्यता आहे.

नक्की वाचा:बर्ड आय चिली मिरच्यांची लागवड ठरेल शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत; मिरचीचा हा वाण आहे अतिशय तिखट

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गवाच्या वाढत्या मागणीच्या  संदर्भात गहू च्या बाबतीत पंजाबला देशातून ऑर्डर मिळू लागल्याने पंजाब मधील अडते आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. खन्ना येथे आशियातील सर्वात मोठी धान्याचे बाजारपेठ आहे.

या युद्धामुळे भारत आणि परदेशातील गहू निर्यातदार यांचा डोळा पंजाब कडे आहे. एवढेच नाही तर आता या गहू निर्यातीच्या व्यापारात आयटीसी आणि अदानी सारख्या बड्या कंपन्या देखील सहभाग घेत असून पंजाब मधील धान्य व्यापारी खूप उत्साही आहेत. जर आपण खन्ना बाजारपेठेचा विचार केला तर येथे जवळजवळ चाळीस लाख टन गव्हाचा साठा आहे.

नक्की वाचा:बादल बरसला! शेतकऱ्याने चक्क 2 लाख 11 हजार रुपये देऊन खरेदी केला बैल, नाव ठेवले बादल आणि जिंकतोय सलग बैलगाडा शर्यत

जर या हंगामातील गहू पिकाचा विचार केला तर जेव्हा हंगामातील गव्हाचे पीक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून येईल तेव्हा खन्ना बाजारपेठेत 200 दशलक्ष टन साठा येण्याचे अपेक्षित आहे. 

या युद्धाच्या परिणामामुळेरशिया आणि युक्रेन या देशांवर गव्हासाठी अवलंबून असलेल्या देशांकडून मोठ्या प्रमाणात गव्हाच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जर हे युद्ध लांबले तर अजून जास्त प्रमाणात नवीन ऑर्डर मिळतील अशी अपेक्षा आहे. जर गव्हाची निर्यात वाढली तर  यामध्ये वाढीव दराने गहू विकणे शक्य होईल असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

English Summary: the distiguish company atc and adani enter into grain market in punjaab
Published on: 30 March 2022, 08:11 IST