महाराष्ट्रात या वर्षी उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण हंगामभर अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न कायम चर्चेत राहिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या फडापासून (Sugarcane Field) ते मंत्र्याच्या एसी हॉलपर्यंत सर्वत्र अतिरिक्त उसाविषयी मोठी चर्चा रंगली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचे तापले आहे.
अजूनही अतिरिक्त उसावर (Sugarcane Sludge) कुठलाच तोडगा निघालेला दिसत नाही. अजूनही राज्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा वावरातच उभा आहे. यामुळे बीड मधील एका अवलिया शेतकऱ्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न मुळासकट संपवण्यासाठी गुऱ्हाळ सुरू केला आहे. बीडच्या गेवराई येथील युवक शेतकरी महेश तांबे यांनी गुऱ्हाळे सुरू करून अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा संपवला आहे.
महत्वाची बातमी
काय सांगता! आता बटाट्यापासून तयार होणार प्लास्टिक; वाचा काय आहे हा माजरा
शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी! लिंबाची शेती केली अन अवघ्या तीन महिन्यात झाले लखपती
यंदा राज्यात सर्वत्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठवाड्यात मात्र याची झळ अधिक आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न या वर्षीचा ऐरणीवर आला आहे असे नाही याआधी देखील अतिरिक्त उसामुळे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते.
शेतकरी महेश तांबे यांना देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न गेली अनेक वर्ष भेडसावत होता. शेतकरी महेश तांबे हे गेली अनेक वर्ष 15 एकरावर उसाची शेती करत आले आहेत, त्यांना अनेक वर्ष जास्तीच्या उसामुळे तसेच ऊस बिलाबाबत कायम अनेक संकटाना तोंड द्यावे लागतं आहे. यामुळे उसाच्या या प्रश्नांवर कायमचे समाधान काढण्यासाठी महेश तांबे यांनी गुऱ्हाळा उभारला. या प्रकल्प मध्ये दिवसाकाठी महेश तांबे 12 टन ऊसाचे गाळप करीत आहेत. यामुळे महेश यांचा ऊस गाळपाचा मुद्दा कायमचा निकाली निघाला आहे.
महेश तांबे यांच्या या प्रकल्पामुळे त्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा मिटला असून यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे. या परिसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी महेश यांच्या गुऱ्हाळ्यात ऊस घालत असून त्यांना यामुळे फायदा होतं आहे.
महेश यांच्या प्रकल्पात दिवसाकाठी दीड टन गूळ उत्पादित केला जात असून. महेश स्वतः बाजारात याची खपत करत आहेत. यामुळे महिन्याला 70 हजार रुपये महेश यांना उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जातं आहे. निश्चितच अतिरिक्त उसावर महेश यांचा हा प्रकल्प रामबाण उपाय ठरला आहे. भविष्यात मराठवाड्यात असे अनेक प्रकल्प उभारले जातील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
Published on: 05 May 2022, 02:11 IST