News

ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस कष्ट करून वाढतात. असे असताना अनेक कारखाने हे उसाच्या वजनात झोल करत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले तसे त्यांनी सिद्ध देखील केले आहे. यामुळे हे वजनकाटे ऑनलाइन करण्याची मागणी केली जात होती.

Updated on 17 January, 2023 12:52 PM IST

ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस कष्ट करून वाढतात. असे असताना अनेक कारखाने हे उसाच्या वजनात झोल करत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले तसे त्यांनी सिद्ध देखील केले आहे. यामुळे हे वजनकाटे ऑनलाइन करण्याची मागणी केली जात होती.

कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस मोजतांना काटामारी केला जात असल्याचा आरोप केला जातो. यासाठी शेतकरी संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात आली आहेत. आता याबाबत मोठा निर्णय घेतला असून पुढील हंगामापासून वजन काटे हे डिजिटल केले जाणार आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मते गेल्या वर्षी कारखानदारांनी जी काटामारी केली त्यातून साडेचार कोटींची साखर तयार करण्यात आली. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे.

अनुदानातील तफावतीमुळे शेतकरी संतप्त, चार लाखांचे अनुदान असून मिळतात अडीच लाख

काटामारी करून साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या उसावर दरोडा घालतात, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कारखानदार उसाच्या वजनात झोल करत असतील त्यांना आळा बसेल.

अनुदानातील तफावतीमुळे शेतकरी संतप्त, चार लाखांचे अनुदान असून मिळतात अडीच लाख

वजन काटे डिजिटल करण्याच्या या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखों ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे त्यांच्या हक्काचे चार पैसे मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
चिंता वाढली! चीनमध्ये धुमाकूळ घातलेला व्हेरिएंट मुंबईत दाखल, पहिल्यांदाच आढळेल 3 रुग्ण
सीबीलमुळे शेतकऱ्याचे कर्ज मंजूर न केल्यास तक्रार कोणाकडे करावी? सरकार आदेशाला बँकांकडून केराची टोपली
'शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, नाहीतर 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा घरावर धडकणार'

English Summary: sugarance wet your days are over! your days are over!
Published on: 17 January 2023, 12:52 IST