Sugar factory: काही दिवसात गळीत हंगाम सुरु होत आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलच्या वापरास मंजुरी दिल्यानंतर इथेनॉलच्या मागणीत वाढ झाली आहे, असे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
ते म्हणाले, भीमा साखर कारखाना भविष्यातील बाजारपेठेची गरज लक्षात घेवून इथेनॉल प्लांट स्थापन करणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ मधील ४३ व्या हंगामातील बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभात खासदार महाडिक बोलत होते.
हेही वाचा: पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
यावेळी मंगलताई महाडिक, विश्वास महाडिक, विश्वजीत महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप, शिवाजी गुंड, भरत पाटील, सुरेश शिवपुजे, महादेव देठे, विक्रम डोंगरे, सज्जन पवार, दत्ता कदम, शंकर वाघमारे, संभाजी पाटील, राहुल व्यवहारे, आबासाहेब शिंदे, तात्या नागटिळक, कार्यकारी संचालक सुर्यकांत शिंदे उपस्थित होते.
पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. आता सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
नागठाणे (ता. सातारा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एकरकमी एफआरपी व आले पिकांची एकत्रित खरेदी यासाठी 'जागर' सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा: अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास मिळणार 2 लाखांची मदत; कशी ते पहा
Published on: 11 October 2022, 04:59 IST