महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. दोन दिवसांपुवी ऊस जर असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येईल असे म्हटले होते.
यावर आता राजू शेट्टी यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, व्वा! गडकरी साहेब एफ आरपीपेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार आत्महत्या करतील का? तसेच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील ऊसापासून इथेनॉल तयार करायला परवानगी दिली तरीही साखर कारखानदार आत्महत्या करतील. शेतकऱ्याने शेतातील ऊसापासून स्वतः इथेनॉल तयार करून ट्रॅक्टरसाठी वापरलं तर पेट्रोलियम कंपनीवाले ही आत्महत्या करतील.
पाकिस्तानातील साखर आयात थांबवली तर तुमचे उद्योजक मित्र आत्महत्या करतील, असे म्हटले आहे. तर जे आजारी पाडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला तर तुमचे राजकीय मित्र आत्महत्या करतील असेही म्हटले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तसेच जर हे नको असेल तर ऊस उत्पादकाने आत्महत्या केलेली केव्हा ही चांगलीच नाही का? असा उपरोधक सवाल राजू शेट्टी यांनी नितीन गडकरींना केला आहे. यामुळे आता भाजपकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राजू शेट्टी अनेक ठिकाणी सभेचे आयोजन करत असून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतीमध्ये आता 'हाच' एकमेव पर्याय, पंजाबराव डख यांनी सांगितले गुपित...
आता कोकणात शेतकऱ्यांसाठी पर्वणी, पहिल्यांदाच भरणार भव्य कृषी प्रदर्शन, 'असे' असणार स्वरूप
बातमी कामाची! सोयाबीनसाठी 53 हजार तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज; पीककर्जाची प्रक्रिया सुरु
Published on: 28 April 2022, 02:58 IST