News

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचले होते त्यामुळे सर्वसामान्य जनता या महागाई मुळे होरपळून निघत होती. अशातच काल केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून मोठा दिलासा दिला होता.

Updated on 22 May, 2022 8:43 PM IST

 पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचले होते त्यामुळे सर्वसामान्य जनता या महागाई मुळे  होरपळून निघत होती. अशातच काल केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून मोठा दिलासा दिला होता.

आता त्यापाठोपाठ राज्यातील महा विकास आघाडी सरकारने देखील जनतेला दिलासा देत पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे 2.08 व 1.44 पैशांची कपात केली आहे. त्यामुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी इंधन दर कपात झाल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असून सरकारच्या निवेदनानुसार ही दरकपात तात्काळ प्रभावाने लागू होईल.

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल व डिझेल वरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ व 6 रुपयांची कपात केली होती.त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर साडे नऊ रुपये तर डिझेल सात रुपयाने स्वस्त झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

 आता नवीन दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर

 राज्य सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रति लिटर दराने तर डिझेल 95 रुपये 84 पैसे प्रति लिटर दराने मिळेल. राज्यामध्ये दोन दिवसात पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहेत तर डिझेल आठ रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.

सरकारने मूल्यवर्धित करात कपात केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भर पडणार असून सरकारला पेट्रोलवर दर महिन्याला जवळपास ऐंशी कोटी तर डिझेलवर एकशे पंचवीस कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. हा हिशोब पकडला तर सरकारी तिजोरीला वार्षिक जवळपास 2 हजार 500 कोटी रुपयांचा महसूलाचा फटका बसेल.

भारतामध्ये राजस्थान सरकारनेदेखील पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे  दोन रुपये 48 पैसे तर एक रुपये सोळा पैशांची कपात करण्याची घोषणा केली होती.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच

नक्की वाचा:Ration Card News:सरकारकडून रेशन कार्ड तपासणीचे आदेश,'या' लोकांचे होणार रेशनकार्ड रद्द

नक्की वाचा:Organic Fertilizer: शेतकरी बंधूंनो! उसाच्या पाचटापासून अशा पद्धतीने तयार करा गांडूळ खत, पिकांना होईल फायदा

English Summary: state government decrease rate of vat to petrol and disel
Published on: 22 May 2022, 08:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)