महाराष्ट्र मध्ये सोयाबीनचे लागवड बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक आधार असलेले पीक आहे. मागच्या वर्षी सोयाबीनला चांगले भाव मिळाले. परंतु यावर्षी परिस्थिती कशी राहील, हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
सध्या देशातील सोयाबीनची एकंदर स्थिती
जर सध्याची सोयाबीनची शिल्लकीचा विचार केला तर जवळजवळ चाळीस लाख टन सोयाबीन अजून शिल्लक आहे.
त्याचा परिणाम हा सोयाबीन पेंड उत्पादन घटण्यावर झाला. यावर्षी सोयाबीनचा शिल्लक साठा जास्त असला तरी येणार्या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
नक्की वाचा:वाचा सोयाबिनवरील तंबाखुची पाने खाणारी अळीचे व्यवस्थापन
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी याचा विचार केला तर सोयाबीनचे गाळप खूप कमी झाले. त्यामुळे सोयापेंडचे उत्पादन घटले. या वर्षी केवळ 54 लाख टन एवढी सोयपेंड उत्पादित झाले आहे.
तसेच सोयाबीन तेलाचे दर देखील देशांतर्गत बाजारपेठेत वाढले होते परंतु त्या तुलनेने सोयापेंडचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या दरांपेक्षा खूप अधिक होते.
याचा परिणाम देशातून जी काही सोयापेंडची निर्यात होते ती तब्बल 13 लाख टनांनी कमी राहिली. जर आपण सोया पेंड निर्यातीचा विचार केला तर ती जवळजवळ सहा लाख टन एवढीच निर्यात होऊ शकली.
नक्की वाचा:Vegetable Market: पाऊस आला भाजीपाल्याचे नुकसान करून गेला,भाजीपाल्याचे दर कडाडले
आताची स्थिती काय राहील?
जर आपण या वर्षीचा विचार केला तर पशुखाद्य आणि मानवी आहार यामधील सोयाबीनचा वापर हा तीन लाख टनांनी वाढला आहे. देशामध्ये सोयाबीनचे गाळप कमी झाल्यामुळे सोयापेंड उत्पादन कमी झाल्यामुळे निर्यात कमी होऊन देखील सोयापेंडचा शिल्लक साठा खूप कमी आहे, असे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन आज इंडियाने म्हटले आहे. चालू खरिपात जून महिन्यात कमी पाऊस झाल्यामुळे देशातला अनेक भागात सोयाबीनच्या पेरणीला उशीर झाला व जुलैमध्ये महाराष्ट्र
प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य असलेले मध्यप्रदेश या ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे याचा फटका सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात बसला व त्याचा परिणाम थेट सोयाबीनचे उत्पादन कमी होण्यावर होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे चालू हंगामातील सोयाबीन जरी जास्त प्रमाणात शिल्लक आहे परंतु त्याचा सोयाबीनच्या दरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
नक्की वाचा:Market Update: मूग आणि उडीद 8 हजाराच्या जवळ, शेतकऱ्यांना मिळू शकतो दिलासा
Published on: 13 August 2022, 10:26 IST