News

शेतात काम सुरू असल्याने शेतात गेलेल्या एका ४७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये या शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कैलास लक्ष्मण गेडेकर असे त्यांचे नाव होते.

Updated on 08 December, 2022 3:09 PM IST

शेतात काम सुरू असल्याने शेतात गेलेल्या एका ४७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये या शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कैलास लक्ष्मण गेडेकर असे त्यांचे नाव होते.

चंद्रपूर परिसरात हिंस्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. कैलास गेडेकर हे सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सामदा, कक्ष क्र. २०१ मध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र ते परत आले नाहीत.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला असता कैलासचा मृतदेह आढळून आला. यावेळी सगळ्यांना धक्काच बसला.

Crop Insurance: बातमी कामाची! गहू, हरभऱ्याच्या पीकविमा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत

शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात वाघाने कैलासवर हल्ला करून ठार केले व मृतदेह जंगलात फरफटत नेला. यामुळे आता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी घराबाहेर पडण्यास भीत आहेत.

वाघाने त्‍यांचे केवळ धड शिल्लक ठवले होते. या घटनेची माहिती वनविभागला देण्यात आल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मुलीचे लग्न जमले होते. मात्र त्यानंतर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! पुणे महापालिकेचे विभाजन, फुरसुंगी उरुळीसाठी नवी नगरपालिका

घटनास्थळी पंचनामा करुन उच्च स्तरीय तपासणी पाठविण्यात आला आहे. मात्र शेतात काम करताना त्यांच्यावर अनेकदा हल्ले होत आहेत. रात्रीची लाईट देखील असल्याने अनेक शेतकरी शेतकरी असतात.

महत्वाच्या बातम्या;
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला जो धडा शिकवेल त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप!!
कांद्याचा वांदा! शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा, शेतकरी अडचणीत
आम आदमीने दिल्ली महापालिकेचे तख्त जिंकले, भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली

English Summary: Shocking! Farmer killed in tiger attack, only body left...
Published on: 08 December 2022, 03:09 IST