राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांचे कुटुंब एक मोठे कुटुंब आहे. पवार परिवारातील सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. असे असताना आता शरद पवार (Sharad Pawar) यांची नात अत्यंत मानाच्या ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिटमध्ये ग्रामीण भागाचे नेतृत्व करणार आहे. देवयानी पवार (Devyani Pawar) या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थात डब्ल्यूईएफच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या परिषदेत सहभागी होतील.
यामुळे ही एक बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देवयानी पवार २०२० मध्ये स्थापन झालेल्या 'ग्लोबल शेपर्स कम्युनिटी'च्या बारामती हबमधून निवडून आलेल्या क्युरेटर आहेत. सप्टेंबर महिन्यात युरोपातील स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आयोजित तीस वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नेत्यांच्या समिटमध्ये उपस्थिती लावतील.
यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. याबाबत त्या म्हणाल्या, ३० वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ग्रामीण जनतेसोबत काम करताना आलेले अनुभव मी मांडणार आहे. ही संधी मिळणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. बारामती हबच्या माध्यमातून युवा वर्ग एकत्र येऊन शाश्वत ग्रामीण भागासाठी काम करेल.
एकापाठोपाठ एक असे चार कारखाने घेतले, कारवाईने राज्यात खळबळ
देवयानी पवार या शरद पवार यांचे पुतणे रणजीत पवार आणि शुभांगी पवार यांची कन्या आहे. रणजीत पवार हे शरद पवारांचे सर्वात ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या या कामगिरीने त्या चर्चेत आल्या आहेत. ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिट स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
ब्रेकिंग! आता दिल्लीत सत्तांतर? केजरीवालांच्या बैठकीला आमदार गायब, मोठी राजकीय घडामोडीची शक्यता..
यामध्ये जगभरातील जवळपास ६०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. देवयानी पवार या ग्लोबल शेपर्सच्या 'बारामती हब' या समाजसेवी संस्थेच्या क्युरेटर म्हणून काम करतात.देवयानी पवार यांनी आधी महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था करुन दिली होती. अनेक समाजसेवी कामे त्यांनी केली आहेत.
महत्वाच्या बातम्या;
ई-वाहनांवर सबसिडी योजनेबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार..
शेतकऱ्यांचा हक्काचा जोडीदार! आज बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा, वाचा या दिवसाचे महत्व..
आर्थिक नियोजन करावं ते दादांनीच! कोरोनात अजित पवारांचे अचूक नियोजन, कॅगकडून कौतुक
Published on: 26 August 2022, 12:23 IST